VIDEO: ‘मुरांबा’ चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित

0

‘मुरांबा’ या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे.

अमेय वाघने ‘चुकतंय… चुकतंय, सगळं सगळं चुकतंय’ हे गाणं गायलं आहे.

‘वाऱ्यालाही फुटलाय घाम… बाप्पा लावतोय डोक्याला बाम’ असे बोल असणाऱ्या या गाण्यामध्ये चुकीची समीकरणं प्रत्ययकारीपणे मांडण्यात आली आहेत. त्यासोबतच गाण्याची चाल, त्यासाठी वापरण्यात आलेली वाद्य आणि त्या वाद्यांचा आवाज आपल्या कानांना आनंद देत आहे. ‘हेही चुकतंय….. तेही चुकतंय’ असं म्हणत अमेयच्या धम्माल शैल्लीमध्ये काही बालगायकांनीही या गाण्यात त्याला साथ दिली आहे.

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘मुरांबा’ चित्रपटातील हे गाणं अमेयनं त्याच्या फेसबुक अकाऊंटवर हे गाणं शेअर केलं आहे. त्यासोबतच जस्टिन बिबरच्या लाइव्ह कॉन्सर्टचा संदर्भ देत त्याने या पोस्टला एक विनोदी कॅप्शनही दिलं आहे. ‘कॅनडाचा बिबर आलाय… त्याला कोथरुडच्या जॉर्डनचं हे गाणं ऐकवा’, असं कॅप्शन अमेयनं लिहिलं आहे. त्यामुळे त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेतही आली आहे.

 

LEAVE A REPLY

*