Video : महापौर निवडणूक – नाशकात शिवसेना राहणार तटस्थ

नाशिकचे पहारेकरी राहू - बोरस्ते

0

नाशिक : नाशिकच्या विकासासाठी शिवसेना नाशिक महानगरपालिकेत महापौर निवडणूक लढवणार नसून सेनेचा कोणताही नगरसेवक मतदान करणार नसल्याची माहिती शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिली आहे.

नाशिकच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मुंबई काय झाले आम्हाला माहिती नसल्याचे बोरस्ते म्हणाले. नाशिकमध्ये मात्र महापौर प्रक्रियेत शिवसेना सहभागी होणार  नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मनसेही या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याची माहिती प्राप्त होते आहे.

कॉंग्रेस आघाडीकडून मात्र महापौर पदासाठी श्रीमती तडवी आणि उपमहापौर पदासाठी पगारे यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवसेना मनसे निवडणुकीत सहभागी नसल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत बघावयास मिळणार आहे.

 

LEAVE A REPLY

*