Video : महापौर, उपमहापौरांचे निवडीआधीच राजीनामे घेउन ठेवलेत – पालकमंत्री

0

नाशिक : भारतीय जनता पार्टीवर नाशिककर जनतेने जो विश्वास दाखवला आहे तो नक्कीच सार्थ ठरवू. शहराच्या सर्वांगिण विकासाबरोबरच पालिकेचा कारभार पारदर्शकपणे करण्यासाठी आम्ही कटीबध्द राहणार आहोत.

मात्र जर कामात कुठे कुचराई किंवा पारदर्शकपणाचा अभाव दिसून आला तर महापौर, उपमहापौरांचे निवडीआधीच राजीनामे घेउन ठेवल्याचे सांगत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपण स्वतः नाशिकच्या विकासाकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.

नाशिकच्या विकासात लक्ष घालतीलच परंतू मी सुध्दा पालकमंत्री म्हणून नाशिकमध्ये पूर्णवेळ बसून लक्ष देणार आहे. जनतेने पक्षावर जो विश्वास दाखला आहे त्याला कोठेही तडा जाउ दिला जाणार नाही.

महापालिका कारभार भ्रष्टाचारमुक्त असावा ही पदाधिकार्‍यांकडून अपेक्षा आहे त्याअनुषंगाने नगरसेवकांना बेैठकित सुचना दिल्या आहेत. नाशिकच्या जनतेला नेमके काय हवे आहे हे निवडणूकपूर्व जनतेकडून ऑनलाईन सुचनांव्दारे जाणून घेण्यात आले आहे. पक्षाच्या जाहीरनाम्यातही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

त्यामूळे आता जनतेला जो शब्द दिला आहे त्याची ध्येयपूर्ती करण्याच्या दिशेने भाजपची वाटचाल राहणार आहे. विमानतळाचा मुददा असो, उद्योग वाढीसाठीचे धोरण, शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न असे अनेक प्रश्न हाती घेवून ते सोडवण्यास प्राधान्य देण्यात येईल. गोदाप्रदुषणाच्या मुददयालाही प्राधान्य  देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*