VIDEO : ‘भेटली तू पुन्हा’चा टीझर प्रदर्शित!

0

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भेटली तू पुन्हा’ चित्रपटाच्या टीझर मधून आलोकच्या (वैभव तत्ववादी ) आयुष्यात आलेले अनपेक्षित वळण आपल्याला बघायला मिळत आहे.

आलोकच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे वेगळी ‘ती’ मुलगी (पूजा सावंत) त्याच्या हृदयात कशाप्रकारे स्थान मिळवते हे पहाणं नक्कीच रंजक ठरेल.

 

दुसऱ्या नजरेत घडणाऱ्या प्रेमकथेबद्दल सांगणाऱ्या चंद्रकांत कणसे दिग्दर्शित, स्वरूप रिक्रिएशन अॅण्ड मीडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि सचिन नारकर, विकास पवार निर्मित ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटातून वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत २८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

LEAVE A REPLY

*