VIDEO: भूमिका शर्माचा डेहराडून ते ‘मिस वर्ल्ड’चा प्रवास!

0

व्हेनिसमध्ये पार पडलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डेहराडूनच्या भूमिका शर्माने मिस वर्ल्डचा किताब पटकवला.

जीममधील एका प्रशिक्षकाने दाखवलेल्या व्हिडिओला आकर्षित होऊन तिने बॉडी बिल्डिंगमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

या क्षेत्राविषयीचे आकर्षण कसे निर्माण झाले याची माहिती काही दिवसांपूर्वी भूमिकाने एका मुलाखतीमध्ये दिली होती.

ती म्हणाली होती की एकदा मी जीममध्ये व्यायाम करत असताना त्या जीममधील प्रशिक्षकांनी मला महिला बॉडी बिल्डरचा एक व्हिडिओ दाखवला.

हा व्हिडिओ पाहून मी थक्क झाले. यापूर्वी मी पुरुषांसारखे महिलांचे शरीर पिळदार असू शकते, असा विचारही केला नव्हता.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर या क्षेत्रात मी काहीतरी करु शकते, असा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर मी या क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला.

भूमिका डेहराडूनमधील जसपाल राणा संस्थेत सध्या बीपीएडचे शिक्षण घेत आहे. मिस वर्ल्डचा किताब पटकावल्यानंतर आता ती ‘मिस युनिव्हर्सल’ होण्याचे स्वप्न बाळगून आहे.

LEAVE A REPLY

*