video : …भाग्य उजळो,लवकरच मंत्रिमंडळात या ! नाथाभाऊंकडून शुभेच्छा स्वीकारतांना सुरेशदादांनी व्यक्त केली मनापासून इच्छा !

0

जळगाव । राज्याच्या राजकारणात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे व सुरेशदादा जैन या दोन कट्टर विरोधकांनी आज खिलाडुवृत्तीचे दर्शन घडविले.

वाढदिवसानिमीत्त आ. खडसे यांनी सुरेशदादांना माजी आ.डॉ.जगवाणींच्या माध्यमातुन भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

तर त्या बदल्यात सुरेशदादांनीही ‘लवकर मंत्रीमंडळात यावे… ही मनापासुन इच्छा’ अशी कामना केल्याचा अनुभव उपस्थितांना आज आला.

या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या संवादाचा हा व्हिडीओ काही क्षणात सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 

माजी महसुल मंत्री आ.एकनाथराव खडसे व माजी आ.सुरेशदादा जैन हे दोन्ही राज्याच्या राजकारणातील वादळच. या दोन्ही नेत्यांमधील राजकीय संघर्ष अवघ्या राज्याने अनुभवला आहे.

या संघर्षापोटी या दोन्ही नेत्यांना त्याची वैयक्तीक किंमतही मोजावी लागली आहे. पण सुख आणि दु:ख या दोन्हींमध्ये धावुन जाण्याची संस्कृती राज्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्याही राजकारणात आजही टिकुन आहे.

शिवसेना नेते माजी आ. सुरेशदादा जैन यांचा आज 74 वा वाढदिवस होता. यानिमीत्ताने माजी महसुलमंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी माजी आ.डॉ.जगवाणी यांच्या माध्यमातुन भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला.

या संवादात आ.खडसे यांनी सुरेशदादांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या. तर सुरेशदादांदांनीही तेवढ्याच दिलदारवृत्तीने शुभेच्छांचा स्विकार करीत आ. एकनाथराव खडसे यांना ‘तुम्ही मंत्रीमंडळात पुन्हा यावे ही मनापासुन इच्छा आहे’ असे सांगत शुभेच्छांचा स्विकार करून खिलाडुवृत्तीचे दर्शन घडविले.

जिल्ह्याच्या विकासासाठी या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावे ही जिल्हावासियांची मनापासुनची इच्छा आहे. कारण दादा-भाऊ ही जोडीच राजकारणच नव्हे तर समाजकारणावरही प्रभाव टाकणारी असल्याचे अनेकांचे मत आहे.

त्यामुळे या दोन्ही मातब्बर नेत्यांच्या एकजुटीतुनच विकास साधला जाईल, अशी अपेक्षा जिल्हावासियांना लागून आहे.

LEAVE A REPLY

*