Video : धावत्या ईस्टीम कार ने घेतला पेट ; तिघे बचावले

0

येवला प्रतिनिधी : धावत्या एस्टीम कारने अचानक पेट घेतल्याची घटना येवला तालुक्यात घडली. चालकाच्या प्रसंगावधानाने वाहनातील तिघांचे प्राण बचावले. नाशिक-औरंगाबाद महामर्गावर येवल्याजवळ अंदरसुल येथे ही घटना घडली.

आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र वाहन चालकाने तातडीने गाड़ी रस्त्याच्या कड़ेला थांबविल्यामुळे गाड़ीतील तिघांचे प्राण बालंबाल बचावले.

गाड़ीतील वायरिंगची शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येवला पालिकेच्या अग्निशमन दलाने आग विझवली.

LEAVE A REPLY

*