#Video# देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक : जळगावच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

0

जळगाव :  ही निवडणूक गल्लीची नसून, दिल्लीची आहे. देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान कोणाच्या हातात सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय घेणारी निवडणूक आहे. देशाला कोण सुरक्षित ठेवून विकासाकडे नेऊ शकतो याचा निर्णय घेणारी निवडणूक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जळगाव येथील विजय संकल्प सभेत केले.

यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरिश महाजन , राज्यमंत्री गुलाबराव पाटील , आमदार तथा जळगाव लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील , आमदार किशोर पाटील , स्मिता वाघ , माजी मंत्री सुरेशदादा जैन , जिल्हापरिषद अध्यक्ष उजवला पाटील यांचेसह इतर उपस्थित होते.

काँग्रेसचे सरकार दुराचारी, अत्याचारी, भ्रष्टाचारी होते, मात्र मोदी सरकारने पाच वर्षात देशात परिवर्तन केले. सामान्य नागरिकांत परिवर्तन झाले, गरीबात परिवर्तन होऊन स्वाभिमानाने देश उभा राहिला आहे. ८० हजार कोटी रुपये जनधनच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचले आहेत. प्रत्येकाच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. काँग्रेसच्या दलालांचे जाळे तोडण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे.

९८ टक्के घरात शौचालये बांधली आहेत. १३ कोटी कुटुंबांना मोफत शौचालये देण्यात आली. महाराष्ट्रात १० लाख घरे बांधण्यात येणार आहेत. यापैकी पाच लाख घरे पूर्ण झाली आहेत. ७२ लाख शेतकऱ्यांना ४७०० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. भारताने हल्ला केल्याचा पुरावा मागणारे दोनच घटक होते ते म्हणजे पाकिस्तान आणि काँग्रेस राष्ट्रवादीची महाखिचडी. त्यांचा जाहीरनामा म्हणतो पाकशी युद्ध नको, चर्चा करू. देशद्रोहाचे कलम १२४ अ काढण्याचे काँग्रेस म्हणत आहे. त्यामुळे अशा देशद्रोह्यांना मतदान करणार का, असा सवाल त्यांनी जनतेला केला. कोण खासदार होणार हे महत्वाचे नाही. हा देश राहिला पाहिजे. भारत राहिला पाहिजे. हिंदुस्थान राहिला पाहिजे.

देशविरोधींचा नायनाट करावा म्हणून नरेंद्र मोदींच पंतप्रधान झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले जळगावचे सोनेरी वैभव परत मिळवून देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत , आमदार राजू मामा ना उद्देशून मुख्यमंत्री म्हणाले की मा तुम्ही सांगता 1 लाखाचा लीड देऊ पण आता तुमच्या सोबत सुरेशदादा आहेत त्यामुळे 1 लाखाचा नकोय सव्वा लाखाचा लीड हवाय आणि ही जबाबदारी गिरीश भाऊ आणि गुलाबभाऊ आपली आहे असेही फडणवीस म्हणाले.

LEAVE A REPLY

*