Video : जीवन प्राधिकरण कर्मचारी बेमुदत संपावर ; नाशकातही निदर्शने

0

नाशिक : जीवन प्राधिकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्तिवेतन, भत्ते याबाबतचे दायित्व शासनाने स्वीकारावे या मागणीसाठी जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे.

नाशिकमधील मायको सर्कल परिसरातील गोलाराम कॉलनीत कर्मचारी संपला बसले असून घोषणाबाजी करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत शासनाने आश्वासन देऊनही अद्याप कुठलीही पूर्तता न केल्यामुळे सरकाचे लक्ष वेधण्यासाठी १ मार्चपासून जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्यास सुरुवात केली होती.

परंतु शासनाकडून मागण्या मान्य झाल्या नाहीत त्यामुळे आजपासून हे कर्मचारी राज्यभर बेमुदत संपावर गेले आहेत. विविध ठिकाणी घोषणाबाजी, निदर्शने करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*