Video : घरेलू कामगार संघाचे धरणे आंदोलन

0

नाशिक : घरेलू कामगारांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या कामगारांच्या समस्या वाढल्या आहेत. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी आठ ते दहा मार्च याकाळात धरणे आंदोलन करण्यात आले

शासनाकडे नियमित समस्यांचा पाठपुरावा करूनदेखील शासन काहीही निर्णय घेत नाही. प्रश्न सोडवण्यासाठी कुठलीही उपाययोजना करण्यात येत नाही. महाराष्ट्र शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात महिला दिनाच्या दिवशीच धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

मागण्या : घरेलू कामगारांची बंद केलेली नोंदणी त्वरित सुरु करावी. तालुकावार नोंदणी केली जावी, अन्नसुरक्षा योजना लागू करावी किमान वेतन अधिनियमांतर्गत वेतन द्यावे, विमासंरक्षण, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती, पेन्शन द्यावे, मोफत आयोग्य सुविधा सारख्या मागण्या घरेलू कामगार संघातर्फे करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*