Video : खासगी डॉक्टरांचा संप सुरूच ; अनेकजण सुट्टीच्या मूडमध्ये

0

नाशिक : निवासी डॉक्टरांना संरक्षण देऊ पण कामावर हजर व्हा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर निवासी डॉक्टर कामावर हजर झाले आहेत. मात्र खासगी डॉक्टरांनी संप सुरूच ठेवला असून अनेक दवाखान्यांना आज टाळे लावलेले दिसून आले.

इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA)च्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, अजून वरिष्ठ पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नसल्याने आमचा संप सुरु आहे. तसेच योग्य तोडगा निघाला नाही तर संप सुरुच ठेवला जाणार आहे. असे सांगण्यात आले आहे.

या संपामध्ये कुठल्याही प्रकारे आपत्कालीन कक्षाची सुविधा खासगी डॉक्टरांकडून ठेवण्यात आली नसल्याने सर्वसामान्यांसह अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

तसेच खासगी डॉक्टरांच्या संपाचे पडसाद सोशल मिडीयावर पडले असून सोशल मिडीयाने डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच अनेक डॉक्टर दवाखान्यांना टाळे ठोकून सुट्टी साजरी करायला निघून गेले आहेत. अशीही माहिती सोशल मीडियात सध्या पोस्ट होत असून या घटनांमुळे अनेकांनी सोशल मिडीयावर डॉक्टरांना लक्ष केले आहे.

Video By : Satish Deogire, Deshdoot, Nashik

LEAVE A REPLY

*