Video : इस्कॉन मंदिरात एक टन पुष्पाभिषेक

0

नाशिक : व्दारका येथील पौर्णिमा बसस्टॉपजवळ असलेल्या इस्कॉनच्या राधा मदनगोपालजी मंदिराला सहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गुरुवारी एक टन पुष्पाभिषेक करण्यात आला. ंयानिमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते.

नाशिकमध्ये ‘हरे कृष्ण’ संस्थेच्या कार्याला 1996 साली सुरुवात झाली. या संस्थेच्या कार्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला असून, एक हजाराहून अधिक भक्त या संस्थेस जोडले गेले आहेत. गुरुवारी श्री श्री राधा मदनगोपालजींच्या प्राणप्रतिष्ठेला सहा वर्षे पूर्ण झाले. यानिमित्ताने मूर्तीला पुष्पाभिषेक करण्यात आला. नाशिककरासाठी हा सोहळा आकर्षण ठरला. यावेळी इस्कॉन मंदिर अध्यक्ष श्रीमान गौरांग प्रभू यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाला सकाळी 5 वाजता मंगल आरतीपासून सुरुवात होणार झाली.

त्यानंतर ‘हरे कृष्ण’ महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन आदि धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सायंकाळी 7 वाजता मूर्तींचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. यावर्षी 1000 किलो पुष्पांच्या पाकळ्यांनी श्री श्री राधा विग्रहांचे अभिषेक करण्यात आला. भगवंताची सेवा हेच आयुष्याचे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन मुंबईच्या इस्कॉन मंदिर समितीचे अध्यक्ष गौरांग प्रभू यांनी केले.

ते म्हणाले, की श्री चैतन्य महाप्रभूंनी कलियुगातील बद्ध जिवांसाठी सुमारे पाचशे वर्षांपूर्वी ‘हरे कृष्ण’ हा महामंत्र दिला होता. आपण कृतज्ञतेने त्याचा स्वीकार करून आपले जीवन सफल करायला यावेळी श्रील प्रभुपादांचे वरिष्ठ शिष्य तितिक्षवा कारुणिका प्रभू यांच्या रॉक संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी एक टन पुष्पांनी श्री श्री राधामदनगोपालजींना अभिषेक करण्यात आला. मोगरा, गुलाब, चाफा, झेंडू, सोनचाफा, चमेली इत्यादी फुलांचा अभिषेकासाठी वापर करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष गोपालानंद प्रभू आणि कृष्णधन प्रभू जानकीनाथ प्रभू, सहस्रशीर्ष प्रभू, मुंबईहून आलेले प्रेमकिशोर प्रभू, माधवाचर्य प्रभू, अंतरंग शक्ती माताजी आणि पूर्ण शक्ती माताजी आदींनी प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

*