शूटिंगदरम्यान विक्की कौशल जखमी, चेहर्‍यावर 13 टाके

0
मुंबई- अभिनेता विक्की कौशलचा चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात त्याला जबरदस्त मार लागला असून चेहर्‍यावर 13 टाके घालण्यात आले आहेत. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने आपल्या सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे. विक्की कौशल सध्या दिग्दर्शक भानु प्रताप सिंह यांच्या एका हॉरर चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटींगवेळी झालेल्या अपघातात विकीच्या चेहर्‍यावर मोठी जखम झाली आहे. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान विकी एका अ‍ॅक्शन सीक्वेंसचा सिन करत होता. त्यावेळी त्याच्यावर एक दरवाजा येऊन पडला. त्यामुळे विक्कीच्या चेहर्‍यावरील हाड फ्रॅक्चर झालं. 18 एप्रिल रोजी हा अपघात झाला. समुद्र किनारी उभ्या असणार्‍या एका जहाजावर आधारित हा चित्रपट आहे. चित्रपटाची कास्ट आणि क्रू गेल्या 5 दिवसांपासून गुजरातच्या शिप ब्रेकिंग यार्डमध्ये चित्रीकरण करत होते. त्यावेळी अ‍ॅक्शन सिन करत असतानाच हा अपघात झाला. दुर्घटनेनंतर एका रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला एअर अ‍ॅम्बुलन्समधून मुंबईत आणण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*