Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार; सर्वच नद्यांना पूर, पर्यटनस्थळांवर बंदी

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरासह संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. गोदावरी खोऱ्यातील सर्वच धरणांतून मोठ्या प्रमाणत विसर्ग होत आहे. पर्यटनस्थळांवर प्रसंगावधान राखत पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. जवळपास सर्वच नद्यांना पूर आला आहे.  अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

सोमेश्वर, त्रंबकेश्वर येथील दुगारवाडी, इगतपुरी येथील भावली धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. त्र्यंबकमध्ये पहिने, पेगलवाडी नेकलेस धबधबा परिसर देखील वनविभागाने निर्मनुष्य केला आहे. नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमधून आज सकाळी आठ वाजता खालील प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  • गंगापूर – 42642 क्यूसेस,
  • दारणा धरणातून 39250 क्यूसेस
  • नांदूरमध्यमेश्वर धरणं 110000 क्यूसेस
  • भावली धरणं 948 क्यूसेस
  • आळंदी धरणं 2717 क्यूसेस
  • पालखेड धरणं 44663 क्यूसेस

गेल्या चोवीस तासांमध्ये त्रंबकेश्वर, आंबोली या परिसरात दोनशे ते तीनशे मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाल्यामुळे गंगापूर, काश्यपी ,गौतमी या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे.

समर्थ रामदास स्वामी पूल

समर्थ रामदास स्वामी पूल

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

त्यामुळे गंगापूर धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग ठराविक अंतराने वाढवला जाणार आहे. याचा परिणाम म्हणून नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून सखल भागात राहणाऱ्या रहिवाशांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.

जनार्दन स्वामी महाराज पूल

नांदूर नाका येथून जेलरोडकडे जाणारा पूल (राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज पूल)

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

सातपूरला महादेव वाडी कांबळे वाडी भिमनगर परिसरात पावसाचे पाणी शिरले नगरसेवक सलीम शेख गोकुळ निगळ दीक्षा लोंढे यांनी नागरिकांची भेट घेऊन सुरक्षित ठिकाणी नेण्याची केली नागरिकांच्या भोजनाची व्यवस्थाही लोकप्रतिनिधींनी केली आहे प्रशासनाद्वारे परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत.

नंदिनी नदी

नंदिनी नदीला महापूर आल्यामुळे तिरडशेत, पिंपळगाव बहुला गावात व घरात पुराचे पाणी शिरले.

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

तिडके कॉलनीत पूल पाण्याखाली, उंटवाडी पुलाला पाणी लागले,शहरात वाहतूकअवघड, रस्त्यावर ठीक ठिकाणी साचले पाण्याचे तळे

पालखेड धरणातून विसर्ग

पालखेड धरणातून सद्यस्थितीत 44हजार 663 विसर्ग

Deshdoot यांनी वर पोस्ट केले शनिवार, ३ ऑगस्ट, २०१९

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!