विकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका

0
मुंबई- विकी कौशलच्या करिअरमध्ये उरी: द सर्जिकल स्ट्राइक माईल्ड स्टोन ठरला. आदित्य धरने उरीचे दिग्दर्शन केले आणि रॉनी स्क्रूवालाने या सिनेमाची निर्मिती केली होती. आता हिच जोडी मिळून आणखी एक सिनेमा तयार करत असल्याची माहिती आहे. हा एक पीरियड वॉर सिनेमा असणार आहे जो अश्वत्थामा यांच्या आयुष्यावर आहे. या पौराणिक सिनेमात अश्वत्थामा यांची भूमिका विकी कौशल साकारणार आहे. उरीनंतर सिनेमाच्या मेकर्सना एका बिग प्रोजेक्टसोबत कमबॅक करायचा आहे. आदित्यने या सिनेमाच्या स्क्रिप्टवर उरी रिलीज झाल्यानंतर काम करायला सुरुवात केली आहे. सिनेमाची शूटिंग पुढच्या वर्षीपासून सुरु होणार आहे. विकी लवकरच करण जोहरच्या तख्तमध्ये दिसणार आहे. यात विकीच्या अपोझिट आलिया भट दिसणार आहे. तख्तफ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. करण जोहर निर्मित या सिनेमात विकी-आलियासह रणवीर सिंग, करीना कपूर, जान्हवी कपूर, अनिल कपूर, आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील.

LEAVE A REPLY

*