Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

म्हसरूळ परिसरात तीन वाहनांची जाळपोळ; आपापसातील वादातून प्रकार

Share
पंचवटी | वार्ताहर
म्हसरूळ परिसरातील वाढणे कॉलनी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी सोसायटीच्या समोर उभ्या केलेल्या तीन दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. म्हसरूळ परिसरात यापूर्वी देखील दहशत निर्माण करण्याच्या हेतूने वाहन तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या घटना झालेल्या आहे. दरम्यान वाढणे कॉलनी परिसरातील घटना आपसातील वादातून झाल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत रितीश भाऊसाहेब लाटे (वय.२४ रा.फ्लॅट नं.६, भास्कर सोसायटी, वाढणे कॉलनी) यांनी तक्रार दाखल केली आहे. रितीश लाटे यांनी गुरुवारी(दि.१८) रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी सुझुकी मोपेड एम.एच.१५, जि टी ७४९१ सोसायटीच्या समोर उभी केली होती.

त्यांच्याच गाडी शेजारी त्यांचा भाऊ रवी लाटे याची एम. एच.१४ सी सी ४९५२ आणि गणेश छगन खेरणार यांची हिरो होंडा सी डी डीलक्स एम.एच.१५ एफ पी ८३६१ उभी होती. दरम्यान मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास झोपेत असतांना त्याना गाडीच्या पेट्रोल टाकी फुटल्याचा आवाज आल्याने लाटे यांच्यासह सोसायटी मधील रहिवासी धावत सोसायटीच्या पार्किंग समोर आले असता त्याना वाहने जळत असल्याचे दिसून आले.
त्यांनी त्वरित घरातील पाणी आणून आग आटोक्यात आणली. यानंतर म्हसरूळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. याबाबत अज्ञात संशयितांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी देखील अश्या घटना झालेल्या असल्याने परिसरातील नागरिक भयबीत झाले आहे. दरम्यान आपसातील वादातून वाहनांची जाळपोळ झाली असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दृष्टीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!