टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

0

पंचवटी : येथील गजानन चौक, पाथरवट लेन परिसरात 40 ते 50 जणांच्या टोळक्याने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रात्री अकराच्या सुमारास घडली.

यामुळे संतप्त नागरिकांनी संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन केले. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पंचवटीतील पाथरवटलेन, गजानन चौक आणि वाल्मिक नगर परिसरातील तरुणांमध्ये गेल्या काही दिवसापासून वादविवाद सुरू होतेल यातूनच आजचे प्रकरण घडल्याची चर्चा परिसरात होती.

रात्री 11 च्या सुमारास 40 ते 50 जणांच्या टोळक्याने अचानक प्रवेश करत दुचाकी, चारचाकी व रिक्षांची तोडफोड केली. तसेच येथील अभिमन्यू लाटे यांच्या घरात घुसून टीव्ही व इतर साहित्याची तोडफोड करत शिवीगाळ केली.

दरम्यान स्थानिक नागरिकांनी संशयित वाल्मिक नगर येथील असल्याचा आरोप करत त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यासाठी ठिय्या आंदोलन केले.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटीचे पोलीस निरीक्षक सुनील पूजारी व इतर अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

 

LEAVE A REPLY

*