शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच

0

नाशिक । दि. 15 प्रतिनिधी
शहरात वाहन चोर्‍यांचे सत्र सुरुच असून आता चोरट्यांनी मोटारसायकलींसह ट्रक तसेच कारसारख्या मोठ्या वाहनांनाही लक्ष केल्याचे चित्र आहे. शहरात नुकत्याच इनोव्हा तवेरा आणि मालट्रकसह दोन दुचाकी अशी महागडेी वाहणे चोरीस गेल्याप्रकरणी पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

महात्मानगर येथील विकास केशव गरूड (रा.ऐरी बंगला,एफ रोड) यांची सहा लाख रूपये किमतीचे इनोव्हा वाहन (एमएच 15 ईपी 9272) मंगळवारी रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात पार्क केलेली असतांना अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली.

याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गायकर करीत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली. राधेश्याम ब्रम्हचारी दुबे (रा.जागृतीनगर,पंचक,जेलरोड) यांचा नऊ लाख रूपये किमतीचा मालट्रक (एमएच 15 बीके 3699) गुरूवारी रात्री एमएसईबी सबस्टेशन समोरील संजेरी रो हाऊस भागात पार्क केलेला असतांना चोरट्यांनी चोरून नेला.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

तर मध्यप्रदेश येथील देवास जिल्हयात राहणारे गोपाल हिरालाल प्रजापती यांची साडे चार लाख रूपये किमतीची तवेरा (एमपी 13 बीए 2372) गुरूवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास नवीन नाशिकच्या पवननगर येथील कृष्णा साडी सेंटर समोर पार्क केली असता चोरट्यांनी पळवून नेली.

याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार भालेराव करीत आहेत. तर इंदिरानगर परिसरातील श्रध्दा विहार कॉलनीत राहणारे सुधीर दिनेश सोनार दि.19 मे रोजी ठक्कर बाजार बसस्थानक येथे गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची स्प्लेंडर (एमएच 16 एक्स 7015) चोरट्यांनी चोरून नेली.

याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार धात्रक करीत आहेत. तर हिरावाडीतील नितीन प्रल्हाद चौधरी यांची पॅशन दुचाकी (एमएच 15 सीक्यू 0125) चोरट्यांनी पाथर्डी फाटा येथील वृषभ होंडा शोरूम भागातून पळवून नेली. ही घटना 10 जून रोजी घडली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार आडके करीत आहेत.
वाहनचोर्‍यांनी नशिककर हैराण झाले असून वाहनचोरट्यांचा वेळीच बंदो

बस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

*