Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकभाजीपाला फळांच्या ७१४ पिशव्या वितरित; नागरिकांनी घेतला घरपोच सेवेचा लाभ

भाजीपाला फळांच्या ७१४ पिशव्या वितरित; नागरिकांनी घेतला घरपोच सेवेचा लाभ

नाशिक । दि.३ प्रतिनिधी

भाजीपाला खरेदिसाठी बाजारात गर्दी होऊन करोना संसर्ग वाढण्याची भिती आहे. ते बघता सह्याद्री फार्म्स व शेतकरी गटाच्या माध्यमातून ग्राहकांना थेट घरपोच भाजीपाला व फळे पोहचवली जात आहे. गुरुवारी ही सेवा सुरु झाली. पहिल्याच दिवशी भाजीपाला आणि फळांचा ७१४ पिशव्यांचे नागरिकांना घरपोच वितरण करण्यात आले. नागरीक देखील संपर्क करुन घरी भाजीपाला मागवत आहेत.

- Advertisement -

करोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी देशभरात लाॅकडाऊन असून फक्त जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरु आहे. विशेषत: भाजीपाला खरेदिसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सोशल डिस्टन नियमाचे उल्लंघन होत आहे.

भाजीपाला व फळे खरेदीसाठी नाशिक शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने सह्याद्री फार्मसह इतर काही शेतकरी कंपन्यांनी गटांच्या माध्यमातून नागरिकांना थेट घरपोच भाजीपाला व फळे वितरणाची सुविधा उपलब्ध करून दिली.

त्याची सुरुवात गुरुवारपासून झाली पहिल्याच दिवशी ७१४ पिशव्यांचे यशस्वीरीत्या वितरण झाले. यामध्ये भाजीपाल्याच्या दोन प्रकारच्या तर फळांच्या दोन प्रकारच्या विषयांचा समावेश आहे.

भाजीपाल्याची वर्गाची पिशवी पाचशे रुपयाला तर ब वर्ग पिशवी साडेतीनशे रुपयांना आहे. अनुक्रमे १९० आणि १५८ पिशव्यांचे पहिल्या दिवशी वितरण झाले. तसेच फळांची अ वर्गाची पिशवी ८०० रुपयांना असून १४८ पिशव्या वितरित झाल्या. तर ब वर्गाची पिशवी ३७५ रुपयास असून २२८ पिशव्या वितरित झाले आहेत. ग्राहकांना दोन्ही पर्याय खुले ठेवण्यात आले आहे. त्यानुसार त्याचे पहिल्या दिवशी योग्य वितरण झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या