Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

श्रीरामपुर : शिथीलतेत भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड

Share

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आज मंगळवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत संचारबंदी नागरिकांना जिवनावश्यक वस्तू घेण्यासाठी शिथील करण्यात आली होती. यावेळी श्रीरामपूरकरांची भाजीपाला खरेदी करण्यासाठी मोठी झुंबड उडाली. किराणा दुकानातही सामान घेण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
दरम्यान कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू केलेली केलेली असल्याने शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे. सोमवारी रात्रीपासूनच शहरातील प्रमुख चौकात बॅरिकेटस लावण्यात आलेले आहेत.

शहरातील भगतसिंग चौक, मोठ्या पाटाजवळ भाजपाला खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. भाजीविक्रेत्यांजवळ ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. कर्मवीर चौक परिसर, गोंधवणी रस्त्यावरील दशमेश चौक परिसर, कॅनॉल लगतच्या परिसर आदी ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. किराणा दुकानातही नागरिकांनी सामान खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. पिठाच्या गिरणीतही लोकांनी गर्दी केली. भाजीपाल्याचे दरही इतर वेळेच्या तुलनेत जास्त होते.

भाजीपाल्याचे दर
कांदे – 30 रुपये किलो
बटाटे – 30 रुपये किलो
लसूण – 30 रुपये पावशेर
शिमला मिरची – 15 ते 20 रुपये पावशेर
कोथिंबीर – 10 रुपये जुडी
दोडके – 20 रुपये पावशेर
टोमॅटो – 30 रुपये किलो
मेथी – 25 ते 30 रुपये गड्डी
पालक – 20 रुपये
भोपळा – 10 रुपये
कोबी – 10 ते 20 रुपये
गवार – 30 रुपये पावशेर
भेंडी – 15 ते 20 रुपये पावशेर
लिंबू – 20 ते 25 रुपये पावशेर
मिरची – 15 ते 20 रुपये पावशेर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!