Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedअमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव

अमळनेर : बसस्थानक आवारात होणार भाजीपाला लिलाव

अमळनेर –

कोरोनामुळे राज्यात झालेल्या लॉकडाऊन मुळे एस टी बसची चाके थांबून काही दिवसांपासून अमळनेर बसस्थानकाचे आवार निर्मनुष्य झालेले असताना हे आवार उद्यापासून सकाळी पुन्हा गजबजलेले दिसणार असून याठिकाणी भाजीपाला लिलाल करण्याचा निर्णय पालिका व महसूल प्रशासनाने घेतला आहे.सोशल डिस्टनसिंगचा उद्देश सफल होण्यासाठीच या जागेची निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे साऱ्याच बाबींची चक्रे उलटसुलट झाली असून यात प्रामुख्याने अमळनेर येथील भाजीपाला लिलाल मार्केटचे कामकाज खूपच अडचणीत आले आहे.

विशेष म्हणजे संचारबंदीत जीवनावश्यक वस्तुत भाजीपाल्याचा समावेश असतानाही या बाजाराची घडी विस्कटली आहे,यास प्रमुख कारण म्हणजे लिलाव करताना बाजारात होणारी गर्दी आणि त्यामुळे सोशल डिस्टनसिंग चा होणार भंग.या प्रमुख कारणामुळे येथील भाजीपाला अडत असोसिएशनने हे मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा माल परस्पर किरकोळ विक्रेत्यांनी खरेदी करावा आणि विक्रेत्यांनी ठिकठिकाणी तो विकावा असे जाहीर केले होते,यासाठी पालिकेने जुना बस स्टॅण्ड येथे जागा उपलब्ध करून त्याठिकाणी आखणी केली होती मात्र काल त्याठिकाणी देखील शेतकरी व विक्रेत्यांची मोठी गर्दी होऊन सोशल डिस्टनसिंग चा फज्जा उडाल्याने नवा पर्याय काढण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

यासंदर्भात अडत व्यापाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत त्यांनी लिलाल करावा असे ठरल्याने सद्यस्थितीत मोकळी पडली असलेल्या अमळनेर बस स्थानकाच्या जागेची निवड यासाठी करण्यात आली असून काल सायंकाळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आखणी देखील केली.

प्रामुख्याने सोशल डिस्टन्स चा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही आखणी करण्यात आली.यावेळी माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड,संजय चौधरी,सोमचंद संदानशिव, विक्रांत पाटील, राधेश्याम अग्रवाल,तसेच एस टी महामंडळ,पालिका व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या