नाशिक ‘कृउबा’मध्ये भाजीपाल्याची आवक वाढली

0

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याचे आज शेतकरी संपाच्या आठव्या दिवशी लक्षणीय आवक दिसून आली. सकाळपासूनच जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून माल विक्रीसाठी दाखल झालेला दिसून आला.

एक जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. सुरुवातीच्या पाच-सहा दिवस भाजीपाला कुठेच मिळत नव्हता मात्र कालपासून नाशिकमध्ये बाजारसमितीत पालेभाज्या आणि फळभाज्या दाखल झालेल्या दिसून आल्या. किरकोळ भाजीपालाच याठिकाणी दाखल झाला होता.

अनेक भरेकर्यांनी शेतात जाऊन माल आणला आणि त्याची विक्री याठिकाणी केली. मात्र अजूनही संपाची धग कायम असून शेतकरी माल विक्रीसाठी आणत नाहीयेत.

आज नाशिकमध्ये शेतकरी परिषद होते आहे. या बैठकीत शेतकरी संघटनेचे वरिष्ठ नेते आणि शेतकरी प्रतिनिधींसह मोठ्या प्रमाणात शेतकरी हजर राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

LEAVE A REPLY

*