विश्वास हॅपीनेस सेंटर तर्फे खवय्यांसाठी ‘व्हेज बिर्याणी पुलाव’ महोत्सवाचे आयोजन

0
नाशिक दि.10, प्रतिनिधी | नाशिकच्या खवय्यांसाठी व्हेज बिर्याणी पुलावाचे वैशिष्टपूर्ण प्रकार असलेल्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विश्वास संकल्प आनंदाचा’, ‘विश्वास ग्रुप’, ‘विश्वास हॅपीनेस सेंटर’ तर्फे सदर उत्सव आयोजित करण्यात आला आहे.  सदर महोत्सवाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची आहे.

शनिवार 11 व रविवार 12 नोव्हेंबर 2017 रोजी दररोज सकाळी  ते 8.00 या वेळेत विश्वास लॉन्स, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे हा महोत्सव संपन्न होईल. मिसळ-सरमिसळ, नाशिक चौपाटी, नाशिक फास्ट, नॉनव्हेज महोत्सव, भजी महोत्सव अशा यशस्वी खाद्यमहोत्सवाच्या आयोजनांनंतर खवय्यांसाठी ही पर्वणी असणार आहे.

विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, नाशिक  रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, सारस्वत बँक, विश्वास लॉन्स यांचे ‘व्हेज बिर्याणी पुलाव’ महोत्सवास सहकार्य लाभले आहे.  मराठी खाद्यसंस्कृतीत व्हेज बिर्याणी पुलावचे अनेक प्रकार आहेत. परंतू त्यापलीकडे व्हेज बिर्याणी पुलावचे वैशिष्ठपूर्ण प्रकार या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत.

त्यांना एकत्र आणून खवय्यांना चवीची  भेट ‘विश्वास गृपने’ घडवून आणली आहे. यामध्ये ‘जैन स्पेशल बिर्याणी’, ‘मटका व्हेज बिर्याणी’, ‘व्हेज दम बिर्याणी’, ‘कोप्ता  व्हेज बिर्याणी’, ‘व्हेज हैद्राबादी बिर्याणी’, ‘व्हेज शाही बिर्याणी’, ‘व्हेज चायनीज बिर्याणी’, ‘व्हेज काश्मिरी पुलाव’, ‘व्हेज ग्रिन पिस पुलाव आदी पदार्थ आनंद द्विगुणीत करणार आहेत.

तरी या  महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे  विश्वास जयदेव ठाकूर, विनायक रानडं, मनेष बुरड- , विवेकराज ठाकूर-आदींनी केले आहे.   हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून एस.आर. केटरर्स  तसेच महोत्सवात विश्वास ग्रुपतर्फे गायकांसाठी अभिनव व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. यामध्ये विशेष गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्पर्धकाने आपल्या मोबाईलमध्ये एक गाण्याचा ट्रॅक आणायचा आहे.

उत्कृष्ट चार स्पर्धकांना पारितोषीके  सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर ती विद्यार्थी, विद्यार्थीनी, खुल्या गटात महिला व पुरूष अशा चार गटांमध्ये स्पर्धा संपन्न होईल. विजेत्यांना ‘उत्सव’ प्युअर व्हेज रेस्टॉरंटतर्फे फुड कुपन्स व जयंत चांदवडकर यांच्यावतीने आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

*