Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक‘व्हेज बास्केट’च्या माध्यमातून शेतमाल घरपोच विक्री उपक्रम

‘व्हेज बास्केट’च्या माध्यमातून शेतमाल घरपोच विक्री उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी

लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विकणे अशक्य झाले आहे. त्यामुळे रा.स्व.संघ गिरणारेनगर व व्हेज बास्केट यांच्या संयुक्त प्रयत्नाने गिरणारे परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल घरपोच विक्री उपक्रम सुरू केला आहे.

- Advertisement -

गिरणारे मधील 4-5 स्वयंसेवक एकत्र येऊन त्यानी ‘ व्हेज बास्केट ‘ नावाने व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु केला आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला, धान्य व फळे मागणीप्रमाणे गिरणारे येथून पॅक करून प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहचविला जात आहे.

करोनापासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने प्रत्येक नागरिकाला घरात राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र,जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांना घराबाहेर पडावे लागते आणि त्यामुळे सरकारने केलेल्या घरात राहण्याच्या आवाहनाचे पालन करता येत नाही.

रा.स्व.संघाच्या सेवा आणि महाविद्यालयिन विभागाने शहराच्या महात्मानगर, गंगापुर रोड, कॉलेज रोड, त्र्यबक रोड परिसरातील मधील नागरिकांना घरपोच शेतमाल मिळावा व शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीचा प्रश्न सुटावा,या अनुषंगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.

ज्यात भोसला गटातील गिरणारे नगरातील स्वयंसेवक गिरणारे परिसरातील शेतमाल हा भोसला गटातील इतर तीन नागरांमध्ये पोहचवण्याचे काम करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या