Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

सावरकर गौरव प्रस्ताव फेटाळला; आधी स्वा. सावरकरांना भारतरत्न द्या! सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडू

Share

मुंबई : प्रतिनिधी

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सावरकरांच्या गौरव प्रस्ताव मंजूर करण्यात यावा अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. मात्र, भारतीय जनता पक्षाने राज्याच्या विधानसभेत मांडलेला सावरकर गौरव प्रस्ताव आज विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नियमावर बोट ठेवत फेटाळून लावला.

सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वीर सावरकरांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काँग्रेसच्या मासिकामध्ये वापरण्यात आला. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी शिदोरी मासिकावरही बंदी घालावी. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त विधानसभेत गौरव प्रस्ताव आणावा अशी मागणी केली.

महाविकास आघाडीने भाजपचा डाव त्यांच्यावर उलटवून लावत सांगितले की, आधी सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या. आम्ही तुमच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडू असे प्रत्युत्तर यावेळी सत्ताधारी महाविकासआघाडीकडून देण्यात आले. यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झालेला बघायला मिळाला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!