Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

राज्यात ‘वंचित’ने दोन माजी मुख्यमंत्र्यांसह पाडले अनेक दिग्गज

Share

मुंबई | प्रतिनिधी

लोकसभेच्या रणसंग्रामात अवघी एक जागा जिंकणाऱ्या कॉंग्रेस पक्षाला वंचित बहुजनच्या उमेदवारांनी चांगलीच धूळ चारली. विशेष म्हणजे कॉंग्रेसची माजी मुख्यमंत्री पदाचे उमदेवारच वंचितच्या उमेदवारांमुळे पडल्याने सर्वाधिक चर्चा होत आहे. आगामी विधानसभेत याचे पडसाद उमटतील अशीही चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत.

वंचितमुळे कॉंग्रेस आघाडीच्या ९ जागा पडल्या असून त्यात अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे या दोन माजी मुख्यमंत्र्याचा समावेश आहे.

प्रारंभी, कॉंग्रेससोबत जागा वाटपाची चर्चा होऊ न शकल्याने राज्यभरात वंचितने ४८ जागांवर उमेदवार उभे केले. यामुळे काँग्रेसला बीड, बुलडाणा, गडचिरोली-चिमूर, नांदेड, परभणी, सोलापूर आणि यवतमाळमध्ये पराभव पत्करावा लागला.

जवळपास आठ जागांवर वंचितच्या उमेदवारांनी आठ लाखांच्या आसपास मत मिळवली. कॉंग्रेससोबतच स्वभिमानीलादेखील याचा फटका बसला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदींना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला

वंचितने घेतलेली मते

अकोला: २७८८४८
औरंगाबाद: ३८९०४२
बीड:९२१३९
चंद्रपूर: ११२०७९
बुलडाणा: १७२६२७
गडचिरोली-चिमूर: १११४६८
हातकणंगले:१२३४१९
हिंगोली: १७४०५१
लातूर : ११२२५५
नांदेड :१६६१९६
नाशिक : १०९९८१
उस्मानाबाद : ९८५७९
परभणी : १४९९४६
रावेर : ८८३६५
सांगली : ३००२३४
सोलापूर : १७०००७
यवतमाळ-वाशिम : ९४२२८.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!