वावीत मध्यरात्री धाडसी दरोडा; पती पत्नीला बांधून ठेवत दीड लाख लुटले

0

सिन्नर, वार्ताहर l तालुक्यातील वावी येथे आज मध्यरात्री 2.30वाजेच्या सुमारास शिर्डी महामार्गालगत साई भक्तनिवासच्या समोर असलेल्या बंगल्यावर सशस्त्र दरोडेखोरांनी सुमारे दीड लाखांची लूट केली.

व्यवसायाने पशुचिकित्सक असणाऱ्या डॉ. रमेश देव्हाड यांच्या घराचा दरवाजा तोडून दरोडेखोरांनी प्रवेश केला. दरवाजा तोडत असताना देव्हाड पती पत्नीने प्रतिकार केला.

मात्र संख्येने अधिक असलेल्या दरोडेखोरांसमोर त्यांची ताकद कमी पडली. पिस्तूलाचा धाक दाखवत दोघांनाही बांधून ठेवत चोरट्यानी सुमारे दीड लाखांचा ऐवज लुटून पळ काढला. नंतर मुलांनी सोडवल्यावर डॉ देव्हाड यांनी पोलिसांना व मित्रांना सूचित केले.

अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधीक्षक दीपक गिरहे, निफाड पोलिस निरीक्षक रणजित डेरे, सिन्नर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, वावी सहायक पोलीस निरीक्षक रणजित आंधळे घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

*