आदिवासी भागात वसुबारसला वाघबारस म्हणतात…जाणून घ्या सविस्तर

0
सुरगाण्यासारख्या ग्रामीण भागात अजूनही पारंपरिक रूढीप्रमाणे दिवाळी सण साजरा केला जातो.

ग्रामीण प्रथेप्रमाणे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वाघबारस. गावाच्या वेशीवर असलेल्या वाघदेवाची मनोभावे पूजा केली जाते. वर्षभरात देवादिकांना केलेले नवस या दिवशी मोठ्या उत्साहात फेडले जातात.

विजयादशमी नंतर पावसाने दिलेल्या उघडीप काळात शेती कामासह मळणीसाठी तयार केलेल्या खळ्याचे पूजन याच दिवशी केले जाते. नवसपूर्ती व खळे पूजनासाठी बोकड किंवा कोंबड्याचा बळी दिला जातो, तर शाकाहारी मंडळी गोड जेवणाचा आस्वाद घेतात.

काही मंडळी वसू बारसेच्या पहाटेच शहरात दाखल होतात. 8 ते 10 जणांचा गट तयार करून ही मंडळी घरोघरी जाऊन दिवाळी 4 दिवसांवर आल्याचा संदेश पोहोचवतात.

गटातील एकाच्या हातात दिवा असतो. त्याच्या आजुबाजूस मोरपिसे व झेंडूच्या फुलांनी सजावट केलेली असते. पहाटेच्या शांत वातावरणात ही मंडळी एका सुरात व तालात दिन दिन दिवाळी गायी म्हशी ओवाळी, गायी, म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या।माझी कपिली गाय बरवे- दुध भरूनी देते चरवेमाझ्या गायीचे तोंड – जसे कपाशीचे बोंड माझ्या गायीची पाठ – जशी चौपाटीची वाटमाझ्या गायीचे शिंग – जशी महादेवाची पिंडतसेच माझी देव गाय भिवरा रे चरत जाय डोंगरा अशा प्रकारची गीते म्हणून सण मागतात.

तर बालगोपाल मंडळी बांबूच्या पाटीत पीठ टाकून तिला झेंडूच्या फुलांनी सजवून-वाघ्याची गाय रं । दूध भात खाय रंवाघ्या गेला रागी। तर डांगर मागीदिवाळी दसरा । भाजीपाला विसराखाऊन खाऊन मातलू। मगून दिवाळी नचलो।अशाप्रकारचे पारंपारीक गीत म्हणून सण मागतात.

सायंकाळी गायी, म्हशी, बैल प्राण्यांची पूजा करून त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. तसेच गोठ्यांची साफ सफाई करून सतत तेवत राहणारा तेलाचा दिवा लावला जातो. आणि दिवाळी सुरू होत असल्याचा संदेश देण्यासाठी ही मंडळी शहराकडे रवाना होण्यासाठी सज्ज होतात.

LEAVE A REPLY

*