उन्हाळा सुरु झाला आहे, सरबतच्या विविध प्रकारांची चव एकदा घ्यायलाच हवी

0
नाशिक |  गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची उष्णता वाढली आहे. लस्सी, आईसक्रीम, लिंबू सरबत, विविध प्रकारचे ज्यूस, थंडपेये सेवन करण्याकडे सध्या अनेकांचा कल दिसून येत आहे.

घरीही आता पाहुण्यांसाठी चहा/कॉफीऐवजी कोकम सरबत किंवा लिंबू सरबत दिले जात आहेत. अनेक महिला विविध प्रकारच्या सरबत आपल्या फ्रीजमध्ये करून ठेवताना दिसून येतात.

असेच काही विविध प्रकारच्या सरबतांची सध्या घराघरांत चर्चा आहे. यात गुलाब सरबत, बडीशेप सरबत, टोमॅटो सरबत, कलिंगड सरबतासारखे अनेक प्रकारचे सरबत आता महिलांकडून केले जात आहेत.

1 ) गुलाब सरबत

साहित्य –  गावठी गुलाबाच्या पाकळ्या अर्धी वाटी , पाणी २ वाट्या , साखर २ वाटी.

कृती – गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात चार तास भिजवाव्यात. नंतर हे मिश्रण त्याचा १ वाटी काढा बनेल इतपत उकळून घ्यावं. उकळी येऊन फेस शांत झाला आणि मिश्रण स्वच्छ दिसू लागलं की गॅस बंद करावा. त्यात चंदन वाळ्याचं तयार केलेलं मिश्रण टाकून ते चांगलं ढवळावं. सरबताचं हे सिरप गाळून कोरड्या बरणीत भरून ठेवावं.

2 ) बडीशोप सरबत

साहित्य – 1 वाटी कच्ची बडीशोप , 2 वाट्या साखर , चवीपुरते मीठ , आवश्यकतेनुसार पाणी.

कृती –  बडीशोप 1 वाटीभर पाण्यात 2 तास भिजत ठेवावी. तोपर्यंत 2 वाटी पाण्यात साखर विरघळवून घ्यावी. बडीशोप पाण्यासकट मिक्सरमधून वाटून घ्यावी. त्यानंतर ती गाळून घ्यावी. मग सारखेच्या पाण्यात मिक्स करावे. सर्व्ह करताना 1 भाग मिश्रणात 4 भाग थंड पाणी आणि चवीपुरते मीठ घालून प्यायला द्यावे.

3 ) टोमॅटो सरबत

साहित्य – आवश्यकतेनुसार टोमॅटो , मिरेपूड , 2 वाट्या साखर , चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार पाणी.

कृती – पिकलेले लाल टोमॅटो घेऊन त्यांची साल काढून टाकावी. नंतर हा गर कुस्कुरून घ्यावा किंवा चाळणीने गाळून घ्यावा. त्यात पुरेसे पाणी घालून ते पाणी पाच मिनिटे उकळावे. नंतर तो रस तसाच घेऊन किंवा गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, थोडी मिरेपूड व चवीपुरते मीठ घालावे. पाहिजे असल्यास बर्फ घालून प्यावयास द्यावे. हे सरबत चविष्ट, पौष्टिक व उत्साहवर्धक आहे.

4 ) कलिंगड सरबत

साहित्य – बिया काढलेल्या कलिंगडाच्या ३ कप मध्यम फोडी , १/४ टीस्पून काळ मीठ , १/२ टेबल स्पून आलं (बारीक चिरून) ,बर्फाचे तुकडे (इच्छेनुसार).

कृती –  मिक्सरमध्ये कलिंगडाच्या फोडी, काळ मीठ आणि आलं घालून बारीक करावे. एकजीव झाले की सर्व्हिंग ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर ज्यूस ओतावा. पेय थंड आहे तोपर्यंतच सर्व्ह करून घ्यावे. ग्लासामध्ये सर्व्ह करताना वरून कलिंगडाचे छोटे तुकडे पेरू शकता.

LEAVE A REPLY

*