सरकारच्या विविध योजनांचा लाभ आता पोस्टाद्वारे थेट घरपोच – एच. सी. अग्रवाल

0
नाशिक | मार्च अखेरपर्यंत पोस्टल बँकेची सुरुवात नाशिकमध्ये होणार आहे. राज्यात ४२ ठिकाणी पोस्टल बँका सुरु करण्यात येणार असल्याची माहिती  महाराष्ट्र आणि गोव्याचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल  एचसी अग्रवाल यांनी दिली. ते आज नाशकात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले की, लवकरच पोस्ट कार्यालयात आधार कार्ड मिळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार असून नागरिकांची यामुळे परवड थांबणार आहे.

पोस्टात आधार मिळणार असल्यामुळे येणाऱ्या काळात पोस्टात रोजगारसंधीदेखील वाढणार आहेत. आधार केंद्रांसाठी शासनाकडून कंत्राट देण्यात येते त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होते.

अनेकांना अजूनही आधारअपासून वंचित राहावे लागत आहे. पोस्टात आधारसुविधा उपलब्ध झाल्यानंतर सर्व प्रश्न मार्गी लागणार असल्याचा दावा केला जात आहे.

तसेच शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थींचे पैसेही आता पोस्ट घरपोच देणार आहे. त्यामुळे पोस्ट येणाऱ्या काळात अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे.

राज्यात ४२ ठिकाणी पोस्टल बँक उभारण्यात येणार असून नाशिकमध्ये मार्च अखेर पोस्टल बँक सुरु होणार असल्याचेही अग्रवाल यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

*