Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश

मुलींनो, आदर्श सून व्हायचंय ? ‘या’ ठिकाणी आहे तीन महिन्यांचा कोर्स

Share

वाराणसी : आजच्या तरुणांना आपलेकरिअर घडवण्यासाठी वेगेवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून संधी आहेत. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी तरुण प्रवेश घेऊन आपले करिअर घडविण्याचा प्रयत्न करतात. परंतु आता मुलींसाठी खास कोर्से उपलब्ध करून दिला आहे. तुम्हाला आदर्श सून कसं बनायचं? म्हणजेच या प्रश्नावर आता आयआयटी बीएचयूने तोडगा काढला आहे.

प्रत्येक मुलीला आदर्श सून व्हायचं असतं. तर प्रत्येक सासूला आपल्या घरात येणारी सून ही देखील आदर्शच हवी असते. ‘आदर्श सून’ बनण्यासाठी खासगी संस्था आणि डॉटर्स प्राईड-बेटी मेरा अभियानाअंतर्गत चक्क तीन महिन्याचा कोर्स तयार करण्यात आला आहे.

आदर्श सून बनण्यासाठी वाराणसीतील काशी हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी विभागाकडून मुलींना प्रशिक्षण देणार आहे. हा तीन महिन्यांचा कोर्स असेल. यंग स्किल्ड इंडियाचे सीईओ नीरज श्रीवास्तव यांच्या मते, समाजात वाढणाऱ्या समस्या पाहता या कोर्सची सुरुवात करण्यात येत आहे. तीन महिन्यांच्या या प्रशिक्षणात आत्मविश्वास, कौशल्य, समस्या सोडवण्याचं कौशल्य, तणावाच्या प्रसंगी दाखवले जाणारे गुण यासोबतच कम्प्युटरची माहिती, फॅशनबद्दलचं ज्ञान, लग्नाचं कौशल्य आणि सामाजिक गुण शिकवले जाणार आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!