Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : एकच मिशन…वंजारी आरक्षण; वाढीव आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये महामोर्चा

Share

नाशिक | प्रतिनिधी 

लोकसंख्येच्या प्रमाणात वंजारी समाजाला वाढीव आरक्षण मिळावे या मागणीसाठी एकटविलेल्या वंजारी समाजाकडून डोंगरे वसतीगृह मैदानावर प्रचंड जनसमुदाय जमला आहे.

याठिकाणी एकच मिशन..वंजारी आरक्षण, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…कोण म्हणतंय देणार नाही…घेतल्याशिवाय राहणार नाही अशा अनेक घोषणा देत वंजारी समाजबांधवांनी डोंगरे वसतीगृह मैदानाचा परिसर दणाणून सोडला.

समाजातील पदाधिकाऱ्यांची याठिकाणी भाषणे झाली. समाज आता एकवटला असून सरकारने दखल घेऊन समाजाच्या वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता आरक्षण वाढविण्यात यावे अशी मागणी याप्रसंगी आंदोलकांनी केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हयात क्रांतीवीर वंसतराव नाईक आरक्षण कृती समितीतर्फे बैठका घेतल्या जात होत्या. त्यानंतर आज प्रचंड जनसमुदाय नाशिकमध्ये दाखल झालेला बघावयास मिळाला आहे.

समाजाच्या मागण्या

१) जातनिहाय जगगणना करण्यात यावी.
२) लोकसंख्येच्या प्रमाणात समाजाला वाढीव १० टक्के आरक्षण द्यावे.
३) उद्योग-व्यवसायासाठी शासनाने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे
४) विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय शासकीय वसतिगृहाची उभारणी करावी
५) स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळाची स्थापना करण्यात यावी.
६) वंजारी समाज भवनासाठी मुंबईत जागा उपलब्ध करून द्यावी
७) समाजातील विद्यार्थ्यासाठी आश्रमशालेतील भत्यामध्ये वाढ करावी
८) एन टी ड भटक्या जमातीसाठी असलेली नॉनिक्रमिलिएरची अट रद्द करावी.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!