Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

‘वंचित’कडे उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदियाळी

Share

जिल्ह्यात 100 इच्छुक, राहुरी, श्रीरामपुरातून सर्वाधिक

अहमदनगर (प्रतिनिधी)– विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने रविवारी नगरमध्ये मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखातीसाठी दिवसभर इच्छुकांची मांदियाळी होती. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी निर्णायक भूमिका बजावणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रविवारी सकाळी वंचितकडून उमेदवारी मागणार्‍या 100 इच्छुकांनी अर्ज नेले. त्यापैकी रात्री 9 पर्यंत 65 जणांची मुलाखत आणि अर्ज वंचितच्या नेत्यांकडे जमा झाले होते.

जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍यांच्या मुलाखतीसाठी वंचितचे पार्लमेंटरी कमिटीचे सदस्य अ‍ॅड. अण्णाराव पाटील नगरला आले होते. यावेळी रेखा ठाकूर, भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, किसन चव्हाण उपस्थित होते. शहरातील एका हॉटेलमध्ये या मुलाखती पार पडल्या. यावेळी मोठ्या संख्येने इच्छुक उपस्थित होते. सुरूवातीला पत्रकारांशी बोलताना अ‍ॅड. पाटील म्हणाले, राजभरातून वंचितकडून उमेदवारीची मागणी करणार्‍यांची संख्या मोठी आहे.

उमेदवारी मागणार्‍यामध्ये मराठा, मुस्लीम,ओबीसी, आदिवासी, प्रधान यासह अन्य जातीधर्माच्या उमेदवारांचा समावेश आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने आम्ही सर्व प्रथम इच्छुकांचे शिक्षण, सामाजिक जडण-घडण, राजकीय पूर्व इतिहास आणि सर्वात महत्त्वाचे त्याची गुन्हे पार्श्‍वभूमीची माहिती घेत आहोत. कोणी कितीही मोठा नेता असला तरी तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यास त्याला वंचितमध्ये स्थान मिळणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, वंचितकडून उमेदवारी मागणार्‍यांमध्ये सर्वाधिक इच्छुक राहुरी तालुक्यातून आहेत. या मतदारसंघातून 14, श्रीरामपूर 9, कर्जत-जामखेड 8, संगमनेर आणि नगर मतदारसंघातून प्रत्येकी 6 इच्छुक आहेत. रात्री उशीरापर्यंत इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या.

कोपरगाव
शरद केरू खरात, जमाल कुरेशी, रमेश नामदेव बागुल, विजय प्रभाकर त्रिभुवन, अ‍ॅड. नितिन हरी पोळ.

राहाता
मधुकर साळवे, सुनील ब्राम्हणे, विश्‍वनाथ पांडुरंग वाघ,

संगमनेर
बापू ताजणे, तन्वीरखान इसहाक पठाण, बानोबी लियाक शेख, बापूराव शंकरराव पवार, अनिल आव्हाड, सुर्यभान गोरे

श्रीरामपूर
डॉ. सुधीर क्षीरसागर, सागर भिंगारदिवे, किशोर तुकाराम साळवी, दादाचंद ताराचंद साठे, अ‍ॅड. रावसाहेब अपाजी मोहन, चरण त्रिभूवन, किरण जगन्नाथ साळवे, विजय गोविंद खाजेकर, कार्लस कचूर साठे.

नेवासा
शशिकांत भागवत मतकर, संजय लक्ष्मण सुखदान, अकर शंकर जाधव, अशोक नामदेव कोळेकर, सोपान महापूर.

श्रीगोंदा
मच्छिंद्र पांडूरंग सुपेकर, कांतीलाल सदाशिव कोकाटे, प्रमोद बाजीराव काळे.

पारनेर
संतोष नगरे, बी.आर. शेंडगे, बाळासाहेब गायकवाड, विनोद सुधाकर गायकवाड.

राहुरी
रावसाहेब राधोजी तनपुरे, विजय मकासरे, मदन सोनवणे, विजय अशोक तमनर, राधेशाम दत्तात्रय कुसमुडे, भरत रंगनाथ भांबळ, सुधाकर आव्हाड, वर्षा बाचकर, अनिल भिमाजी जाधव, सागर माधवराव दोन्दे, बाबासाहेब मकासरे, सुनील गबाली गुलदगड, सचिन बडेकर, हतिफ शेख.

नगर
प्रतिक अरविंद बारसे, प्रेत्रस किसन गावरे, अशोक सोनवणे, जिवनहरी पारधे, योगेश थोरात, संजय एकनाथ कांबळे.

कर्जत- जामखेड
सरस्वती भगवान घोडके, नितिन अर्जुन अवचर, अ‍ॅड. डॉ. अरूण जाधव, मजर काझी, भिमराव वाघ, अमोल देवळे, भास्कर भैलुमे, अंकूश भैलुमे.

पाथर्डी
अमोल अशोक गर्जे.

अकोले
दिपक यशवंत पथवे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!