Video : “व्हॅलेंटाईन डे स्पेशल” सून मेरे हमसफर…

0
अहमदनगर : आपल्या जोडीदाराविषयी मनात भावना कितीही असल्या तरी प्रेमाचा तो एक दिवस काहीतरी खास असतो. व्हॅलेंटाइन दिवसाचे निमित्त असल्यावर जोडीदाराला प्रेमाचे प्रतीक असलेली काही भेटवस्तू देण्यासाठी तरुणांसह ज्येष्ठ लोकसुद्धा बाजारात गर्दी करतात.

आपल्या जोडीदारावरचं आपलं प्रेम व्यक्त करण्याच्या या दिवसाआधी सात दिवस व्हॅलेंटाइन आठवडा साजरा केला जातो. या आठवड्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्व आहे. त्यांच्या नावाप्रमाणे त्या त्या दिवशी वेगवेगळी भेटवस्तू देण्याचं महत्व आहे. विशेषतः तरुणांमध्ये प्रचलित असलेल्या या दिवसासाठी विविध प्रकारच्या भेटवस्तू बाजारात आलेल्या आहेत.

व्हॅलेंटाइन डे’ या खास दिवसासाठी शहरातील चौकाचौकात भेटवस्तूंची दुकाने सजली आहेत. गिफ्ट आर्टिकल्स, ग्रीटिंग गॅलरीज्मध्ये विविध आकारातील टेडिबेअर, हार्ट शेपमधील कुशन्स आणि अनेक शोभिवंत वस्तू आकर्षक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.

‘रेड रोझ’ची मागणी वाढली
व्हॅलेन्टाईन डे ला प्रियकराने प्रेयसीला कुठलेही ‘गिफ्ट’ दिले तरी शेवटी प्रत्येकजण ‘रेड रोझ’ सोबत देतोच. प्रेमाचे प्रतीक असलेले टवटवीत असे गुलाबाचे फूल पाहून प्रेयसीच्या गालावरदेखील नकळतपणे गुलाबी छटा उमटते. बाजारातील फुलमार्केटमध्ये बाहेरून मागविण्यात आलेल्या गुलाबांना मोठी मागणी असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी दिली आहे. चौकाचौकात गुलाबाच्या फुलांनी व पुष्पगुच्छांनी दुकाने सजलेली आहेत.

भेटवस्तूंमध्ये नवीन ट्रेंड…

भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये हृदयाच्या आकाराचे बाहुले नवीन आलेले आहेत. यात प्रेम व्यक्त करणारे संदेशही लिहिलेले आहेत. तसेच हृदयाच्या आकाराचे किचेन यांचेही यावेळी तरुणांमध्ये वेड आहे. वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रेमाचा संदेश लिहिलेले हे किचेन तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

LEAVE A REPLY

*