Type to search

हिट-चाट

वैभव व प्राजक्ताचा टीपी क्लिक झाला व्हायरल

Share
Vaibhav and prajakta mali timepass click viral

तरुणींचा लाडका आणि चार्मिंग अभिनेता वैभव तत्ववादी व गोड, गोंडस आणि सगळ्यांची आवडती प्राजक्ता माळी या दोघांची मैत्री सर्वश्रुत आहे. दोघांनी अनेकदा एकत्रितपणे त्यांच्या डान्सचा जलवा दाखवला आहे. खरंतर हे दोघे नृत्यासाठी एका मंचावर उतरले, तर त्यांच्या तोडीस तोड परफॉर्मन्स देणं भल्याभल्यांना जमत नाही.

नृत्य सादरीकरणाच्या वेळी ते मंचावर करत असलेली धमाल आणि अर्थातच त्यांची ऑफस्क्रीन मैत्री यात बरंचसं साम्य आहे. दोघांच्या चाहत्यांनी सुद्धा त्यांच्यातील ही घनिष्ट मैत्री अनेकवेळा पाहिलेली आहे. याच खास मैत्रीचा आणखी एक पुरावा सध्या पाहायला मिळत आहे, तो प्राजक्ताच्या इन्स्टाग्रामवर!!!

प्राजक्ताने नुकताच आपल्या इन्स्टा प्रोफाइलवर वैभवसोबत एक फोटो टाकला आहे. मोठ्या कालावधीनंतर या दोन खास दोस्तांचा एकत्र फोटो पाहायला मिळाला असल्याने, त्यांचे चाहते सुद्धा खूप खुश आहेत. हा फोटो काढण्याची संधी त्यांना मिळाली, ती ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’

या कार्यक्रमाच्या निमित्ताने! ‘झी टॉकीज’ दरवर्षी हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करते. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०१९’ या सोहळ्याचे सूत्रसंचालन वैभव तत्ववादी याने केले आहे.

त्याची मैत्रीण प्राजक्ता माळी हिने या कार्यक्रमात उत्तम नृत्य सादर केलेले आहे. यानिमित्ताने दोघेही एकत्र आले होते. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’मधून मिळालेली ही संधी न दवडता, त्यांनी एक झकास फोटो काढून घेतला. त्यांच्या मैत्रीचा हा नवाकोरा पुरावा आता चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरलेला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!