वडपाडा पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा; ‘सोशल नेटवर्किंग’च्या जलाभियानातील सातवे गाव टँकरमुक्त

0
नाशिक। सोशल नेटवर्किंग फोरमच्या मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या जलाभियान उपक्रमांतर्गत स्पार्टन हेल्थ सेंटर,नाशिक डॉक्टर्स,फेसबुक सोशल नेटवर्कर्स व पाणी व्हॉट्सअप ग्रूप यांच्या सहकार्याने पेठ तालुक्यातील वडपाडा या अतिदुर्गम पाडयावर मोफत पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला. फोरमने विकसित केलेल्या एसएनएफ पॅटर्नअंतर्गत पाण्यासाठी स्वयंपूर्ण झालेले हे सातवे गाव आहे.

वडपाडा येथील या सामाजिक पाणी योजनेचा लोकार्पण सोहळा गावातीलच कष्टकरी माहिलांच्या हस्ते पार पडला. प्रारंभी पाण्याच्या टाकीतील पाण्याचा विसर्ग करून लोकार्पण करण्यात आले.सोशल नेटवर्किंग फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी जलाभियान उपक्रमाचा हेतू विषद केला आणि उपक्रमातील दात्यांचे आभार मानले.

सरपंच सुरेश दहावाड यांनी या योजनेच्या पुढील देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी घेतली. अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.यावेळी डॉ.ए.के. पवार यांनी ग्रामस्थांनी पाण्याच्या सुविधेचा चांगला वापर करून घेण्याचे आवाहन केले. डॉ. पंकज भदाणे आणि अभियंता प्रशांत बच्छाव यांनी गावाने वृक्षारोपण व हागणदारी मुक्त गाव करण्याचे प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

सहायक पोलीस निरीक्षक प्रविण साळूंके, पोलीस उपनिरीक्षक घुगे, डॉ.माधवी मुठाळ, डॉ.सरला सोहनंदानी, राहुल कदम, संतोष कोठावळे, डॉ. समीर पवार, रामदास शिंदे, डॉ.उत्तम फरताळे, अ‍ॅड. गुलाब आहेर,सचिन शेळके, राजेश बक्षी-कतार, संदीप बत्तासे, रमेश वळी, स्पार्टन हेल्थ सेंटरचे अभिजित भोसले आणि सहकारी, दिलीप जायभावे, सुलक्षणा आहेर, सरपंच सुरेश दहावाड , उपसरपंच किसन दहावाड, पोलीस पाटील किसन गावीत, नामदेव गावीत, शंकर चौधरी, हरिदास गावीत यांचेसह वडगाव, शेवखंडी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन सोशल नेटवर्किंग फोरमचे समन्वयक रामदास शिंदे यांनी तर अभियंता प्रशांत बच्छाव यांनी आभार मानले.

वडगाव पाणी प्रकल्पाचे आश्रयदाते : स्पार्टन हेल्थ सेंटर या तरुणांच्या संस्थेने वीजपंप घेऊन दिला. याशिवाय परफेक्ट डेव्हलपर्स,फेसबुकवरील तरुण तसेच व्हाट्सअ‍ॅपवर स्थापन झालेल्या पाणी ग्रूपच्या सदस्यांनीही पाईप घेण्यासाठी भरघोस मदत केली.

यापूर्वी स्वयंपूर्ण झालेली गावे : गढईपाडा, तोरंगण, शेवखंडी, फणसपाडा, खोटरेपाडा, माळेगाव.

काय आहे एसएनएफ पॅटर्न? : गावोगाव अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या पाणी योजनांची पहाणी करून योजनेच्या अपयशाची कारणे शोधली जातात. तज्ञांच्या सहकार्याने समस्या कायम स्वरूपी सोडवण्यासाठी उपायोजना केल्या जातात.शेवटी लोकसहभागातून आर्थिक निधी, तज्ञांचे मार्गदर्शन आणि गावकर्‍यांचे श्रमदान या त्रिसूत्रीवर आधारीत गावचा पाणी प्रश्न साडवला जातो.

LEAVE A REPLY

*