Type to search

Breaking News देश विदेश

वडोदरा : सेफ्टिक टँकमध्ये श्वास गुदमरल्याने सात जणांचा मृत्यू

Share

अहमदाबाद : गुजरातमधल्या बडोदा जिल्ह्यात एका हॉटेलमधील सेफ्टिक टँक साफ करत असताना घुसमटून चार सफाई कर्मचाऱ्यांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेची नोंद दभोई पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, पोलीस कर्मचारी, अँब्युलन्स आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

बडोदा शहरापासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या दभोई तालुक्यातील फर्तिकुई गावातल्या एका हॉटेलमध्ये ही घटना घडली. हॉटेलमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दभोई तालुक्यातील थुववी गावातील चार जण सेफ्टिक टँक साफ करण्यासाठी टाकीमध्ये उतरले होते.

जेव्हा एक सफाई कर्मचारी मॅनहोलमधून बाहेर आला नाही, तर इतर जण त्याला पाहण्यासाठी टाकीत उतरले आणि सगळ्यांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला.

या दुर्घटनेत हितेश हरिजन (२३), त्यांचे वडील अशोक हरिजन (४५), महेश हरिजन (२५), महेश पन्नवाडिया (४६), विजय चौधरी (२२), शाहदेव वसावा(२२) आणि अजय अशी मृत्यू झालेल्यांची नवे आहेत. या घटनेने दभोई परिसरावर शोककळा पसरली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!