Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकोरोनाविरोधी लस तयार

कोरोनाविरोधी लस तयार

2 आठवड्यात होतोे व्हायरसचा नाश
वॉशिंग्टन – अमेरिकेतील संशोधकांनी कोरोनाविरोधी लस तयार केल्याचा दावा केला आहे. पहिला टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे असा दावाही त्यांनी केला आहे. पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसीनच्या शास्त्रज्ञांनी अशी लस तयार केली आहे, कोरोना ( जी कोविड-19) शी लढण्यासाठी पुरेसे अँटीबॉडीज तयार करण्यासाठी सक्षम आहे. ही लस दिल्यानंतर 2 आठवड्यात व्हायरसला निष्क्रिय करेल, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. पिटकोवैक असं या लसीचे नाव आहे. या लसीचा प्रयोग उंदरावर करण्यात आला, जो यशस्वी झाला आहे.

उंदराला ही लस देण्यात आली, 2 आठवड्यातच त्याच्यामध्ये झपाट्याने अँटीबॉडीज तयार झाले. आता या लसीचा दीर्घकाळ काय परिणाम येतो त्याची प्रतीक्षा आहे. मात्र गेल्या वेळी मर्स लसीच्या प्रयोगातही उंदरांनी अशीच प्रतिक्रिया दिली होती आणि एक वर्ष त्यांच्यामध्ये व्हायरसची लक्षणे दिसली नाहीत. ही लस विकसित करण्यात सहभागी असणारे असोसिएट प्रोफेसर एन्ड्रिया ग्यामबोट यांनी सांगितलं, सार्स आणि मार्स जे कोविड-19 च्या जवळचे आहेत, त्यांच्यावर आम्ही जो अभ्यास केला होता तो आम्हाला कामी आला.

- Advertisement -

आम्हाला स्पाईक प्रोटीनबाबत माहिती झाली, जो या व्हायरसविरोधात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. आम्हाला माहिती होतं की या व्हारसविरोधात आम्हाला कुठे लढायचे आहे. या लसीला थंड ठिकाणी किंवा फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे इतर ठिकाणी नेणेही सुरक्षित आणि सोयीस्कर आहे, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. आता मानवी परीक्षणासाठी शास्त्रज्ञांनी अमेरिकाच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या