Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिकच्या अभिनेत्रीची भुमिका असलेला ‘वा पैलवान’

नाशिकच्या अभिनेत्रीची भुमिका असलेला ‘वा पैलवान’

नाशिक । प्रतिनिधी

अस्सल आदिवासी मातीतल्या कुस्तीची मेजवानी असलेला ‘वा पैलवान’ हा नव्या दमाचा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटात चित्रपटात पैलवानाच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता श्वेतचंद्र तर प्रमुख अभिनेत्री म्हणून नाशिकच्या पल्लवी कदम हिची मुख्य भुमिका आहे. नुकतीच पल्लवीने देशदूत कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी तिने चित्रपटातील अनुभव कथन केले.

- Advertisement -

ती म्हणते, कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे. ‘नावासाठी नव्हे तर गावासाठी’ होणारी कुस्ती आपल्याला ठाऊक नसेल. आदिवासी पैलवान लढतो तो नावासाठी नव्हे तर गावासाठी. आदिवासी कुस्तीगिरांची परंपरेचे दर्शन या चित्रपटातून घडते.

एकीकडे कुस्तीचा आखाडा आणि दुसरीकडे विवाह अशा कठीण परिस्थितीला समर्थपणे तोंड देत या चित्रपटातल्या नायकला यशासाठी त्याची नायिका कशी साथ देते हे या चित्रपटातून रेखाटण्यात आले आहे. या चित्रपटातून आदिवासी सौंदर्य व संस्कृतीचे दर्शनदेखील घडते यामूळे ग्रामीण भागात हा चित्रपट नावलौकीक प्राप्त करेल असे पल्लवी म्हणते.

आणि तिथून माझा अभिनयाकडे प्रवास सुरु झाला. परंतु घरच्यांनी आधी शिक्षण आणि नंतर करिअर करण्यास सांगितल्याने मुळे कॉम्पुटर इंजिनिरगचे शिक्षण पुणे केले. गेल्या दोन वर्षापासून मी मुंबईत स्थायिक झाले. (या क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईत राहण्यासाठी शिवाय पर्याय नाही) मुंबईत प्रा.वामन केंद्रे सर यांच्या कडून अभिनयाचं प्रशिक्षण घेतल व या क्षेत्रातला खरा प्रवास सुरु झाला. प्रथम काही मालिकांमध्ये काही सीन पुरती संधी मिळाली.

पुढे संजय नार्वेकर अभिनित ’फक्त सातवी पास’ या सिनेमात त्याची लहान बहीण तर अंकुश चौधरी अभिनित ’जरब’ सिनेमात संजय खापरे सोबत काम केले. मात्र खर्‍या अर्थाने दखलपात्र अभिनय केला तो लवकरच प्रदर्शित होत असलेल्या ‘ग्रे’ या वैभव तत्ववादी अभिनित मराठी सिनेमात.

त्याचबरोबर अभिषेक जावकर दिग्दर्शित व अभिनेत्री प्रार्थना बेहरे लीड करीत असलेल्या ‘ग्लिटर’ या हिंदी वेब सिरीज मध्ये सीबीआय महिला अधिकार्‍याची भूमिका मला मिळाली. तर गावासाठी झोकून दिलेल्या पैलवानाची कथा ‘वा पैलवान’ या चित्रपटातून मला मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक डॉ. कुंडलिक केदारी यांनी संधी दिली. सदर सिनेमात मी राधा या मुख्य नायिकेच्या भूमिकेत असल्याचे तिने सांगितले.

ऐश्वर्या रायची डमी 

नाशिकमध्ये खाकी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना एका गाण्याच्या चित्रीकरणात बॅकग्राऊंंड डान्सर म्हणून काम करण्याची संधी पल्लवीला मिळाली हेाती. इतरांपेक्षा वेगळी देहयष्टी, उंची, वर्ण, साधर्म्य ऐश्वर्या रॉय सारखी असल्यामुळे नृत्य दिग्दर्शकाने ऐश्वर्या रायच्या डमीसाठी तिची निवड केली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या