Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेसाठी दुपारपर्यंत ६० टक्के मतदान

Share

नाशिक | प्रतिनिधी

क्रांंतीवीर वसंतराव नाईक शिक्षणसंस्थेचा पंचवार्षिक निवडणूकीत सत्ताधारी कोंडाजी मामा आव्हाड व हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील प्रगती व तुकाराम दिघोळे व पंढरीनाथ थोरे यांच्या नेतृत्वाखालील क्रांतीवीर पॅनलमध्ये सरळ-सरळ लढत होत आहे. आज दुपारपर्यंत अंदाजे ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान पार पडले आहे. गेल्या पंचवार्षिकला ९० टक्के झालेले मतदान आणखी पाच टक्क्यांनी वधारून ९५ टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मविप्र नंतर जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असा व्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेचा लौकिक आहे. संस्थेचे 8 हजार 608 सदस्य ज्येष्ठ विश्वस्त मंडळ, पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचे सदस्य अशा एकूण 29 जागांसाठी संस्थेच्या मुख्यालयात सकाळी 7 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

मतदानासाठी 39 बुथ लावण्यात आले असून 351 कर्मचारी काम करत आहेत. एका बुथवर एकूण 9 कर्मचारी असून निवडणुकी दरम्यान, कोणताही अनुचीत प्रकार घडू नये, या करीता संंपूर्ण मतदान प्रकीयेवर सीसीटीव्हीची नजर याठिकाणी आहे.

निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ड. गजेंद्र सानप, ड. अशोक कातकाडे, ड. संतोष दरगोडे याच्या नेतृत्वाखाली ही निवडणुक प्रक्रीया पार पडत आहे. सत्ताधारी प्रगती आणि क्रांतीवीर पॅनलमध्ये मुख्य लढत आहे. संस्थेच्या जागा विक्री, सभासद नोंदणी, मयत सभासदाच्या वारसांना सभासदत्व, विकासकामांचे श्रेयवाद आदी मुद्दयांवरून दोन्ही पॅनलमध्ये चिखलफेक झाली. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अखेरपर्यंत सुरू होत्या. दोन्ही पॅनलकडून विजयाचा दावा केला जात आहे.

आरोप प्रत्यारोप आणि हमरी तुमरी 

निवडणूक घोषित झाल्यापासून सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आज मतदानाच्या दिवशीही दिसून आल्या. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली तर अनेकांनी नानाविध आरोप एकमेकांवर केले.

वाहतूक कोंडी

शहरातील मध्यवर्ती असलेल्या व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेत मतदानासाठी सकाळपासून मोठी गर्दी झाली आहे. डोंगरे वसतीगृह मैदान आज वाहनांनी पूर्ण भरलेले दिसून आले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण मतदानासाठी दाखल झाल्यामुळे संस्थेच्या मुख्यालयामध्ये मोठी गर्दी झाली. यामुळे कॅनडा कॉर्नर, डोंगरे वसतीगृह मैदान तसेच गंगापूर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!