Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

गॅस सिलिंडर स्फोटात दुमजली इमारत जमीनदोस्त, १० जण ठार

Share

उत्तरप्रदेश : गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दुमजली इमारत कोसळल्याने दहा जण ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील मुहम्मदाबाद येथील होगना परिसरातील मऊ येथे सोमवारी सकाळी घडली.

अधिक महती अशी कि, घरातील महिला स्वयंपाकघरात सकाळचा नाश्ता बनवत असताना अचानकपणे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या भयानक स्फोटात दुमजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे जागेवरच कोसळली.

तसेच, परिसरातील इतर इमारतींनाही या स्फोटाचा तडाका बसला. अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

या घटनेत १० जण ठार तर ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. सांगितले जात आहे की, वलीदपूर निवासी छोटू बढई यांच्या घरात सकाळी सात वाजता ही घटना घडली. सुरुवातीला गॅस सिलिंडर स्फोट होण्यापूर्वी सिलिंडरला अगोदर आग लागली. त्यानंतर सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. स्फोटाचा आवाज येताच परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. दरम्यान, इमारतच जमीनदोस्त झाली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!