Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

नवरीच्या चॅटींगच्या सवयीमुळे लग्नाच्या दिवशी नवरदेवाने मोडले लग्न

Share

नवी दिल्ली : भारतात लग्न तुटण्याचं कोणतही कारण असू शकतं. कोणी हुंडा दिला नाही म्हणून लग्न तोडत तर कोणता नवरा जास्त दारू पितो म्हणून लग्न तुटतं. कधी काळा रंग असतो म्हणून लग्न तुटत तर कधी कमी शिक्षण असतं म्हणूनही लग्न तुटतं. पण उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये वेगळंच प्रकरणं समोर आलंय. इथे एका मुलीचं लग्न एवढ्याचं कारणासाठी तुटलं की ती तासनतास व्हॉट्सअॅपवर असते.

सदर तरुणाचे नौगाव सादत गावातील एका तरुणीसोबत लग्न ठरले होते. ठरल्याप्रमाणे शुक्रवारी ७ सप्टेंबरला त्यांचे लग्न होणार होते. नवरी मुलगी तयार होऊन मंडपात देखील आली होती. मात्र नवऱ्याकडील मंडळींनी नवरीच्या वडिलांना फोन करून लग्न मोडल्याचे कळविले. याप्रकरणी नवरीच्या वडीलांनी हुंडा दिला नाही म्हणून लग्न मोडल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविली. नवऱ्याकडच्यांनी आमच्याकडे ६५ लाखांचा हुंडा मागितला होता. मात्र तो देण्यास आम्ही असमर्थ ठरल्याने त्यांनी लग्न मोडल्याचे सांगितले.

नवऱ्यामुलाने मात्र त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले असून नवरीच्या सतत मेसेज करण्याच्या सवयीमुळे त्याने लग्न मोडल्याचे सांगितले आहे. ‘ती सतत व्हॉट्सअॅपवर चॅट करत असायची. मुळे मी हे लग्न मोडले, असे नवऱ्यामुलाने पोलिसांना सांगितले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!