उत्तरप्रदेश : गोरखपूरमध्ये 48 तासांत 30 बाळांचा मृत्यू

0

उत्तरप्रदेशातील गोरखपूरच्या बाबा राघवदास रूग्णालयात मागील 48 तासात 30 बाळांचा मृत्यू झाला आहे.

मेंदूज्वर हे या मृत्यूंमागचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे.

‘कम्युनिटी मेडिसीन’ विभागाचे प्रमुख डॉ. डी. के. श्रीवास्तव यांनी या संदर्भातील माहिती ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिली. 30 पैकी 15 लहान मुले महिन्याभरापेक्षा कमी वयाची होती. तर इतर 15 पैकी 6 मुलांचे वय 1 महिन्यापेक्षा जास्त होते.

बुधवार मध्यरात्र ते शुक्रवार मध्यरात्र या 48 तासांच्या कालवाधीत हे मृत्यू झाल्याचे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

*