Type to search

सेल्फी

स्ट्राईप्सचे कपडे वापरताय?

Share

व्यवस्थितपणाची आवड आपल्यापैकी बहुतेकांना असतेच. त्यामुळे कुठेही जाताना वेगळेपणा दाखवण्यासाठी स्ट्राईप्स सारखा पर्याय नाही. शर्ट किंवा पँट या दोन्हींमध्ये स्ट्राईप्स ड्रेसला औपचारिकता देतात. उन्हाळ्यातही ही स्टाईल उत्तमच. स्ट्राईप्स असलेले ब्लेझर हा तर स्टाईल जपणार्‍या पुरुषांसाठी हवेच. हे ब्लेझर आपण लिनन शर्ट, स्लीम फीट पँटवर घालू शकतो. पायात चामड्याचे बूट आपल्या स्टाईलला अधिक उठाव देतात. हा ड्रेस कोणत्याही कारणासाठी योग्यच दिसेल.

हेड टू टो स्ट्राईप्स : डोक्यापासून खालपर्यंत स्ट्राईप्सची स्टाईल करुन पहायला काही हरकत नाही. यासाठी स्ट्राईप्स असणारा फुल सूट परिधान करणे, हा सर्वात सोपा मार्ग. पण अशी स्टाईल करताना चुकीच्या पद्धतीने स्ट्राईप्स असलेले कपडे वापरू नका. उदा- शर्टावर तिरक्या स्ट्राईप्स नि पँटवर उभ्या स्ट्राईप्स असे काही भयानक प्रकार घालू नका. आपण शर्ट व पँट दोन्ही वर उभ्या स्ट्राईप्स असलेला ड्रेस घातला किंवा आपली उंची सहा फुटापेक्षा जास्त असेल, तर डोक्यापासून पायापर्यंत स्ट्राईप्सची स्टाईल जोकरपेक्षा फार वेगळी दिसणार नाही. त्यामुळे शर्ट व पँटवर स्ट्राईप्स स्टाईल वापरताना विचार करुन वापरणे श्रेयस्कर .

योग्य मेळ घाला : स्ट्राईप्स चे कपडे घालताना विचारपुर्वक घालायला हवे. नाहीतर आपले हसे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर मोठ्या, जाड, ब्राईट रंगाच्या स्ट्राईपचा शर्ट वापरणार असू तर साधी, डार्क रंगाची पँट त्याखाली घाला. त्यामुळे आपल्याला हवे असणारे लोकांचे लक्ष स्ट्राईप्स च्या शर्टकडे जाईल. स्ट्राईप किती जाड आहेत, किती अंतरावर आहेत, हे शर्ट निवडताना हमखास लक्षात ठेवायला हवे. आपल्या शर्टवरच्या स्ट्राईप्स फार बारिक किंवा जाड, लांब किंवा अतिजवळ नसाव्यात. खूप जाड स्ट्राईप्स लक्ष वेधून घेत नाहीत, तर बारिक स्ट्राईप्स बघणार्‍याला गोंधळात टाकतात. एक इंचापेक्षा कमी जाड असणार्‍या स्ट्राईप्सचे शर्ट वापरण्याकडे कल ठेवावा.

स्ट्राईप्सचे सॉक्स : संपूर्ण ड्रेसमधली ही छोटी गोष्ट, पण तिच्याकडे लक्ष द्यायलाच हवे. त्यामुळे आपल्या ड्रेसला परिपूर्णता लाभते. सॉक्सवरही स्ट्राईप्स असतील याकडे लक्ष द्या. बर्‍याचदा आपण पुरुष सॉक्सकडे दुर्लक्ष करतो. पण आडव्या स्ट्राईप्सचे सॉक्स वापरणे आपण टाळायला हवे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे सॉक्स बुटांच्या रंगाशी नव्हे पँटच्या रंगाशी मिळते जुळते असायला हवे. छोटी गोष्ट पण ती ड्रेसची शोभा वाढवते किंवा घालवते. जरी स्ट्राईप्स कितीही आवडत असले तरीही स्ट्राईप्स असलेल्या सॉक्स अजिबात वापरायचे नाहीत. अगदी वापरायचेच असतील तर बारिक स्ट्राईप्स असलेले, ब्राउन किंवा खाकी रंगाचे सॉक्स वापरू शकतो. नाहीतर एवढी सगळी काळजी घेऊन केवळ सॉक्स मुळे आपला हशा व्हायचा.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!