Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

हुंडेकरी अपहरण; आ. जगतापांसह नातेवाईकांची पोलिसांकडे धाव

Share

अहमदनगर | प्रतिनिधी

उद्योजक करीम हुंडेकरी यांच्या अपहरणामुळे शहरात काळजीपूर्वक शांतता पसरली आहे. तोफखाना पोलिसांनी अपहरणाची फिर्याद नोंदविण्यास सुरूवात केली आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या आवारात यावेळी मोठी गर्दी केली होती. आमदार संग्राम जगताप यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून हुंडेकरी कुटुंबियांना धीर दिला.

उद्योजक करीम हुंडेकरी यांचे आज पहाटे त्यांच्या घरापासून अपहरण झालेे. या घटनेमुळे शहरातील उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. शहर पोलिसांनी शहरात नाकेबंदी केली असून, करीम हुंडेकरी यांच्या सर्जेपुरा येथील घराजवळ बंदोबस्त वाढविला आहे.

शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्यासह सर्जेपुरात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. दरम्यान, हुंडेकरी यांच्या नातेवाईकांकडे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली आहे.

त्यानंतर हुंडेकरी यांचे कुटुंब तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी या अपहरणाची गंभीर दखल घेत तोफखाना पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. हुंडेकरी यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला. यावेळी माजी उपमहापौर नजीर शेख, उबेद शेख, अशोक बाबर आदी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक ईशू सिंधू, अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी इतर जिल्ह्यातील पोलिसांशी संपर्क साधून जिल्ह्याच्या सीमेंवर नाकाबंदी केली आहे.

त्याचप्रमाणे खबर्‍यांना अलर्ट केले आहे. अपहरणांपैकी एकाची माहिती मिळाली आहे. त्यानुसार त्याच्या व तो संपर्कात असलेल्यांचा शोध घेतला जात आहे. हा अपहरणाचा गुंता उलगडण्यास लवकरच यश येईल असे शहर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!