Thursday, May 2, 2024
Homeनाशिककोविड चाचणीसाठी हेल्मेटचा वापर

कोविड चाचणीसाठी हेल्मेटचा वापर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना संसर्गामुळे नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या रोजच वाढत आहे.

- Advertisement -

शहरात कोरोना रॅपिड टेस्टिंग किटचा देखील तुटवडा आहे. त्यामुळे लोकांना टेस्ट करून घेण्यास अडचणी होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना टेस्टसाठी ताटकळत राहावे लागत आहे. त्यावर उपायोजना म्हणून एक पाऊल पुढे जाऊन प्राथमिक तपासणीसाठी नाशिक शहारत प्रथमच अत्याधुनिक हेल्मेटचा वापर करून हजारो लोकांची तपासणी थर्मल स्कनिंग करणे शक्य झाले आहे.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व भारतीय जैन संघटना नाशिक यांच्या माध्यमातून या मोहिमेचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 7 मधील बालगणेश फाउंडेशन येथून करण्यात आला. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष गणेश गिते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, दिपक हांडगे, आनंद फारताळे, हर्षल पाटील, डॉ. मोहित पटेल, कल्याणी पाटील, संजीवनी पाडावी, प्रतीक्षा अमराळे आदी उपास्थित होते.

प्रभागातील अशोक स्तंभ, गोदावरी नगर, घारपुरे घाट अश्या दाट लोकवस्ती व जास्तगर्दीच्या ठिकाणी अत्याधुनिक हेल्मेटचा वापर करून परिसरात तपासणी करण्यात आली व या तपासणीत ज्या लोकांना संसर्ग झाल्याचे प्राथमिक तपासणीत दिसून आले त्यांची अँटीजन रॅपिड टेस्ट बालगणेश फाउंडेशन येथे करण्यात आली असून यात 7 पॉझिटिव्ह सापडले आहेत.

या अत्याधुनिक हेल्मेटचा वापर करून एका मिनिटाला 200 लोकांची प्राथमिक चाचणी शक्य असल्याने, आरोग्य यंत्रणेचा वेळ व खर्च दोन्हीही वाचवण्यास मदत होईल व शहरातील जास्तीतजास्त लोकांची प्राथमिक चाचणी करण्यास मदत होईल अशी माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या