गुगलचे ड्युओ अ‍ॅप वापरा..पैसे कमवा…

0
गुगलने आपल्या ड्युओ अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी भारतीय युजर्ससाठी रिवॉर्ड प्रणाली जाहीर केली असून यातून युजर्सला आर्थिक लाभदेखील घेता येणार आहे.

गुगलने ड्युओ या नावाने ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलींग अ‍ॅप गेल्या काही वर्षांपूर्वी सुरु केले होते.  मात्र गुगलच्या या अ‍ॅपला पाहिजे तशी पसंती मिळाली नाही. या स्पर्धेत अनेक अ‍ॅप आल्यामुळेही हे अ‍ॅप अनेक युजार्स्ने दुर्लक्षित केले.

त्यामुळे गुगलने याच्या प्रमोशनला प्रारंभ केला आहे. या अनुषंगाने गत महिन्यात ड्युओ युजर्ससाठी डाटा रिवॉर्ड प्रोग्रॅम सुरू करण्यात आला आहे. याला पहिल्यांदा फिलीपाईन्समध्ये सादर करण्यात आले आहे.

याअंतर्गत गुगल ड्युओ अ‍ॅप वापरणार्‍यांना त्याच्या मोबाईल सेवा पुरवठादाराकडून अतिरिक्त डाटा प्रदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आता याच प्रकारचे प्रमोशन हे भारतातही करण्यात येणार आहे. मात्र यातील डाटा रिवॉर्डमध्ये डाटा नव्हे तर रोख रक्कमेची तरतूद करण्यात आलेली असून याद्वारे युजर्स पैशांची कमाई करू शकणार आहेत.

गुगल पे अकाउंटमध्ये रक्कम जमा केली जाणार

गुगल ड्युओ अ‍ॅप वापरणार्‍या युजरला रिवॉर्ड मिळणार आहे. अर्थात, ही रक्कम त्याच्या बँक खात्यात नव्हे तर गुगल पे अकाऊंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. तसेच कोणताही युजर हा आपल्या मित्रांना संबंधीत अ‍ॅप वापरण्याची विनंती करूनदेखील याच प्रकारात रिवॉर्ड मिळवू शकतो. याअंतर्गत रेफर करणारा आणि यावरून ड्युओ अ‍ॅप वापरणार्‍या या दोघांना पैशांमध्ये रिवॉर्ड मिळणार आहे. सध्या हे अ‍ॅप अँड्रॉइड प्रणालीच्या युजर्ससाठीच लागू करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*