Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याहेल्मेट वापरा, अन्यथा असहकार

हेल्मेट वापरा, अन्यथा असहकार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा (Helmet should be used) यासाठी शहर पोलिसांकडून (City Police) दंडात्मक कारवाई (Punitive action) ऐवजी वेगवेगळे उपक्रम राबवून हेल्मेट (Helmet) घालण्यास प्रवृत्त केले जात आहे. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यापासून दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घातल्यास त्यांना शहरात असहकार (Non-cooperation) अनुभवयास मिळणार आहे. त्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना शासकीय कार्यालयात प्रवेश नसेल (No access to government office). तसेच गॅरेज, व्यावसायिकांकडून सहकार्य मिळणार नाही, अशी मोहीम राबवण्यात येणार आहे.

- Advertisement -

शहरात 15 ऑगस्टपासून हेल्मेट नसलेल्या चालकांना पेट्रोल (Prtrol) मिळत नसल्याची मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे सुरुवातीला पेट्रोल भरण्यापुरते का होईना दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करत आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात शहर पोलीस विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पकडून त्यांना ट्रॅफिक एज्युकेशन पार्क येथे दोन तास समुपदेशनासाठी पाठवत आहेत. त्यात दररोज सुमारे 80 दुचाकीस्वारांना पकडून समूपदेशन केले जात आहे.

सकाळी व सायंकाळी दोन सत्रात हे समुपदेशन वर्ग भरत असल्याने नोकरदार, विद्यार्थी व व्यावसायिकांना याचा फटका बसत असल्याने वेळेची बचत करण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करण्यावर भर दिला आहे. यानंतर आता तिसर्‍या टप्प्यात शहर पोलिसांनी दुचाकीस्वारांसाठी ‘असहकार’ मोहीम राबविण्याचे नियोजन केले आहे.

त्यात ज्या दुचाकीस्वारांकडे हेल्मेट नसेल त्यांना शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयांमध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच किराणा, गॅरेज, मॉल, बाजारपेठा, इतर दुकानांमधून व्यवहार करता येणार नाही. पोलिसांच्या गांधीगिरी मोहिमेमुळे चालकांना असहकार अनुभवयास मिळेल. हा नकोसा असहकार टाळण्यासाठी दुचाकीस्वारांना हेल्मेटचा वापर करण्याशिवाय पर्याय नसेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या