Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

२६/११ : हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास अमेरिकेकडून ५० लाख डॉलर्सचे बक्षीस

Share

वाशिंग्टन : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरही यातील दोषींवर कारवाई न होणे हा पीडितांचा अपमान आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावानुसार या हल्ल्याचे सुत्रधार हाफिज सईद आणि जाकीउर रहमान लखवी यांना शिक्षा देणे हे पाकिस्तानची जबाबदारी आहे, अशी मागणी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी केली आहे. तसेच या दोघांना पकडण्यासाठीच्या बक्षिसातही अमेरिकेकडून वाढ करण्यात आली असून ती ५० लाख डॉलर अर्थात ३५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.

भारतावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात ६ अमेरिकी नागरिकांसह मृत पावलेल्याप्रति अमेरिका सहवेदना व्यक्त करत आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पियो यांनी सांगितलं. पाकिस्ताननं लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांविरोधात कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. मुंबईवरील या दहशतवादी हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा देणं आवश्यक आहे. या हल्ल्यातील दोषींवर अद्याप कारवाई न करणं हा या हल्ल्यातील पीडितांचा अपमान असल्याचं पोम्पियो यांनी नमूद केलं.

दरम्यान, मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांची देशवासियांकडून प्रत्येक वर्षी आठवण काढली जाते. यावेळीही यानिमित्त मॅरेथॉनसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!