अमेरिकेकडून पाकिस्तानला 70 कोटी डॉलरचे फंडिंग

0

अमेरिकेकडून अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या अभियानाला समर्थन देण्याच्या बदल्यात पाकिस्तानला अमेरिकन काँग्रेसने 4.5 हजार कोटी रूपयांच्या (70 कोटी डॉलर) मदतीचा प्रस्ताव मंजूर केला आहे.

अमेरिका आघाडी सहायता निधीकडून (सीएसएफ) ही रक्कम पाकिस्तानला देण्यात येणार आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार हा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

पाकिस्तानने त्यांना मिळालेली मदत दहशतवादी समूहाला पुरवू नये याकडे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने लक्ष ठेवण्याची विनंती एनडीएएने केली आहे.

LEAVE A REPLY

*